Join us

१९९३ साखळी बॉम्बस्फोट : फारुख सहकार्य करत नाही - सीबीआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:46 AM

१९९३ साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी फारुख यासीन मन्सूर अका उर्फ फारुख टकला तपासासाठी सहकार्य करत नसल्याचे सीबीआयने विशेष टाडा न्यायालयाला सोमवारी सांगितले. विशेष न्यायालयाने त्याच्या सीबीआय कोठडीत २८ मार्चपर्यंत वाढ केली.

मुंबई : १९९३ साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी फारुख यासीन मन्सूर अका उर्फ फारुख टकला तपासासाठी सहकार्य करत नसल्याचे सीबीआयने विशेष टाडा न्यायालयाला सोमवारी सांगितले. विशेष न्यायालयाने त्याच्या सीबीआय कोठडीत २८ मार्चपर्यंत वाढ केली.१९९३ च्या बॉम्बस्फोटाच्या कटात फारुख टकलाचा सक्रिय सहभाग होता, असे सीबीआयचे म्हणणे आहे. दाऊद इब्राहिम आणि अनीस इब्राहिम यांच्याप्रमाणे फारुखही या कटात सक्रिय होता. त्याला ८ मार्च रोजी दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली. बॉम्बस्फोटाच्या कटात आरोपीचा सहभाग आहे. बरीच माहिती त्याच्याकडून मिळवायची आहे. मात्र, आरोपी खरी माहिती तपास यंत्रणेपासून लपवत आहे. त्याची या बॉम्बस्फोटातील भूमिका, या केसमध्ये दाऊद व अनीस सोडून आणखी कोण महत्त्वाच्या व्यक्ती सहभागी आहेत का, याबाबत फारुखने काहीही माहिती दिलेली नाही,’ असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. त्यामुळे पोलिसांनी २८ मार्चपर्यंत टकलाला सीबीआय कोठडी ठोठावली.

टॅग्स :गुन्हा अन्वेषण विभागमुंबई