‘राज्यातील २ कोटी १० लाख बालकांना गोवर - रुबेलाचे लसीकरण’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 06:01 AM2018-12-25T06:01:03+5:302018-12-25T06:01:57+5:30

राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या गोवर - रुबेला लसीकरण मोहिमेत गेल्या २८ दिवसांत २ कोटी १० लाख बालकांना लस देण्यात आली.

 '2 crore 10 lakhs children in the state - immunization of rubella' | ‘राज्यातील २ कोटी १० लाख बालकांना गोवर - रुबेलाचे लसीकरण’

‘राज्यातील २ कोटी १० लाख बालकांना गोवर - रुबेलाचे लसीकरण’

Next

मुंबई : राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या गोवर - रुबेला लसीकरण मोहिमेत गेल्या २८ दिवसांत २ कोटी १० लाख बालकांना लस देण्यात आली. लसीकरणाचे ६० टक्क्यांहून अधिक उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. लसीकरणादरम्यान राज्यभरात २६ हजार ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या परिरक्षण (तपासणी) मोहिमेत, राज्याला सुमारे २१ निकषांमध्ये ९९ टक्के गुण मिळाल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.

लसीकरणाच्या मोहिमेस २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. लसीकरण मोहीम कशा प्रकारे राबविण्यात येत आहे, याच्या पाहणीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने राज्यात २६ हजार ठिकाणी परिरक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती. लसीकरणाचे ठिकाण, लसींची उपलब्धता, सीरिंजचा वापर, लस देण्याची शास्त्रशुद्ध पद्धत, लसीकरणादरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास करायच्या तातडीच्या उपाययोजनांची, औषधांची उपलब्धता, अशा विविध २१ प्रकारच्या निकषांची यात तपासणी करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्राला सरासरी ९९ टक्के गुण मिळाले आहेत. ज्यांचे लसीकरण झाले नाही, त्यांच्यासाठी आता सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे.

Web Title:  '2 crore 10 lakhs children in the state - immunization of rubella'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.