राज्यभरात विविध कारवाईत २ कोटीचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 06:41 PM2020-04-19T18:41:37+5:302020-04-19T18:41:56+5:30

रत्नागिरी, अकोला मध्ये सर्वात कमी गुन्हे

2 crore penalty was imposed in various operations across the state | राज्यभरात विविध कारवाईत २ कोटीचा दंड वसूल

राज्यभरात विविध कारवाईत २ कोटीचा दंड वसूल

Next


मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात केलेल्या विविध कारवाईत २ कोटीचा दंडासहीत ३६ हजार ९३५ वाहने जप्त करण्यात आले आहे. गेल्या २९ दिवसातील ही कारवाई आहे. राज्याराज्यांमध्ये जमावबंदी आणि संचारबंदी आदेश जारी करण्यात आले. याच आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५५ हजार ३९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  २२ मार्च ते १९ एप्रिलच्या पहाटे चार वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. यात  ५६७ जणांवर ‘होम क्वारंटाइन’चे आदेश धुडकावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तसेच व्हीसा नियमांचे उल्लंघन करणाºया परदेशी व्यक्तींविरोधात १५ गुन्हे नोंदवण्यात आले. 

आतापर्यन्त पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ७२ हजार ६४४ तक्रारी नोंद झाल्या आहेत.  या कारवाई दरम्यान पोलिसांनी ३६ हजार ९३५ वाहने जप्त करण्यात आले आहेत. तसेच अवैध वाहतुक प्रकरणी १०५१ गुन्हे दाखल करत ११६४५ जणांना बेडया ठोकल्या आहेत. यात एकूण २ कोटिं ६ लाख ७३ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान राज्यभरात  ४० पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यात ८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांनाच टार्गेट केले जात आहेत. आतापर्यन्त पोलिसांवर हल्ले केल्याप्रकरणी १०५ गुन्हे दाखल झाले असून ३०१ जणांना बेडया ठोकण्यात आल्या आहेत. 
...........................................

रत्नागिरी, अकोला मध्ये सर्वात कमी गुन्हे
पुणे शहर (८१००) मध्ये सर्वाधिक  १८८ अंतर्गत गुन्हे दाखल आहे. त्यापाठोपाठ अहमदनगर ( ५३८२), पिंपरी चिंचवड़ (४६८८), मुंबई (३०१५) यांचा क्रमांक लागतो. यात रत्नागिरी (५५) , गडचिरोली (८०), नंदुरबार (९५) येथे सर्वात कमी गुन्हे दाखल झाले आहेत. तर राज्यभरात सगळीकड़े पोलिसांवर हल्ल्यां प्रकरणी गुन्हे दाखल होत असताना  नागपुर ग्रामीण,  गडचिरोली आणि गोंदिया येथे एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.  

Web Title: 2 crore penalty was imposed in various operations across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.