सर्व्हंट क्वॉर्टरवर २ कोटींचा खर्च; २ वर्षांत शासकीय बंगल्यावर ६० कोटींचे नूतनीकरण, दुरुस्ती
By दीपक भातुसे | Published: March 11, 2024 08:19 AM2024-03-11T08:19:33+5:302024-03-11T08:19:58+5:30
विशेष म्हणजे बंगल्यात राहणारे मंत्रीही अनभिज्ञ असल्याचे ‘लोकमत’ने काही मंत्र्यांशी संपर्क केल्यानंतर समोर आले आहे.
दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर मोठा खर्च झाल्याची बाब ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरून दिसून आली असून, एका सर्व्हंट क्वॉर्टरवर २ कोटींवर खर्च झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलाखा शहर विभागाने दरवर्षी मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करण्याचा हा पराक्रम केल्याचा आरोप करत वें. ल. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
मागील सहा महिन्यांत शासकीय बंगल्यांवर ३० कोटींची कामे काढल्याचा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणला होता. यात अधिक माहिती घेतली असता २०२१-२२ व २०२२-२३ या दोन आर्थिक वर्षांत मलबार हिल आणि मंत्रालयासमोरील मंत्री बंगल्यांचे नूतनीकरण आणि दुरुस्तीवर ६६ कोटी रुपये खर्च झाल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे बंगल्यात राहणारे मंत्रीही अनभिज्ञ असल्याचे ‘लोकमत’ने काही मंत्र्यांशी संपर्क केल्यानंतर समोर आले आहे.
बंगल्याचे नाव खर्च २०२१-२३ या वर्षात मागील सहा महिन्यात
शिवगिरी ३.५४ कोटी २.०९ कोटी
शिवगड १.७५ कोटी १.०४ कोटी
पावनगड १.२९ कोटी ८३. २ लाख
पर्णकुटी ३.२१ कोटी १.४९ कोटी
रॉयलस्टोन ८८.६८ लाख १.५८कोटी
अग्रदूत ३.५४ कोटी १६.८३ लाख
नंदनवन ८२ लाख १६.९४ लाख
रामटेक २. ०४ कोटी ७५.४ लाख
मुक्तगिरी-
ज्ञानेश्वरी ८.१७ कोटी ३.३६ कोटी
शिवनेरी १.९३ कोटी १.७२ कोटी
सेवासदन २.०८ कोटी १६.८४ लाख
देवगिरी १.५२ कोटी १९.८९लाख
जेतवन-
सातपुडा २ कोटी १.२३ कोटी
तोरणा १.५४ कोटी ४. ६४ कोटी
प्रतापगड १.६० कोटी ३५.९९ लाख
रायगड १.१२ कोटी ७६.८ लाख
लोहगड १.६१ कोटी ८७.४६ लाख
सिंहगड २.९७ कोटी ५२.३७ लाख
रत्नसिंधू २.५४ कोटी ४५.८१ लाख
जंजिरा ७९.२ लाख १.१२ कोटी
विजयदुर्ग १.२० कोटी १.५३कोटी
सुवर्णगड १.३५ कोटी ७३ लाख
अजिंक्यतारा ८९.६ लाख ८०.४ लाख
ब्रह्मगिरी ५४ लाख १.५७ कोटी
राजगड १.१८ कोटी ४६.२३ लाख
चित्रकूट ३.४८कोटी २.७६ कोटी
बी -६ ६९.३ लाख ७२.७ लाख
बी-७ ५२.९ लाख १६.८१ लाख
----००००----