२ कोटींची अवैध कीटकनाशके जप्त, गोदामावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 06:22 AM2017-11-23T06:22:42+5:302017-11-23T06:22:46+5:30
मुंबई : कृषी आयुक्तालयाच्या भरारी पथकांनी अकोला, सांगली, जळगावसह राज्यातील विविध ठिकाणी धाडी टाकून २ कोटी २३ लाख रुपये किमतीच्या कीटकनाशकांच्या अवैध साठा जप्त केला
मुंबई : कृषी आयुक्तालयाच्या भरारी पथकांनी अकोला, सांगली, जळगावसह राज्यातील विविध ठिकाणी धाडी टाकून २ कोटी २३ लाख रुपये किमतीच्या कीटकनाशकांच्या अवैध साठा जप्त केला आहे, अशी माहिती निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण संचालक मच्छिंद्र घोलप यांनी दिली.
विनापरवाना तसेच कालबाह्य कीटकनाशके व रासायनिक खते विक्री करणाºया दुकानांवर तसेच उत्पादन कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कार्यवाहीत कृषी रसायन एक्सपर्ट प्रा. लि., केमिनोव्हा इंडिया प्रा. लि., एफएमसी इंडिया प्रा. लि., बायोस्टॅड्ट इंडिया प्रा. लि. या कंपन्यांचा एकूण १९७. २७ लाख रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच भारत इन्सेक्टीसाईड, मे. रेनबो क्राप हेल्थ लि. या कंपन्यांच्या गोडावूनमधून एकूण २६ लाख ६६ हजार रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा जप्त केला आहे.
सांगली जिल्ह्यातील कार्यवाहीत दोन खत उत्पादक कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भरारी पथकाने मे. मायक्रो लॅब, कुपवाड एमआयडीसी या ठिकाणी छापा घातला. तेथे एक ट्रकमध्ये सेंद्रिय खत मे. क्लासवन अॅग्रो बायोटेक अॅण्ड फर्टिलायझर (येळावी, ता. तासगाव) या कंपनीचे खत मे. मायक्रो लॅब या कंपनीचे नाव लावून रिपॅकिंग केले जात होते. दुसºया ट्रकमध्ये ५० किलोच्या १२० पोती दुसºयाच नावाने भरल्याचे आढळले. तसेच गोदामात सिलीकॉन व सेंद्रिय खताचा साठा आढळला. या उत्पादकास या खतांचा उत्पादन व विक्री परवाना नाही.
या कंपनीने खत नियंत्रण आदेश व जीवन आवश्यक अधिनियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या कारवाईत ५०.८५ मे. टन खत साठा व दोन ट्रक जप्त करण्यात आले व या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
>भारत इन्सेक्टीसाईड, मे. रेनबो क्राप हेल्थ लि. या कंपन्यांच्या गोदामामधून एकूण २६ लाख ६६ हजार रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा जप्त केला आहे.