मुंबई : जून महिन्यात आलेल्या एकत्रित भरमसाट वीज बिलांमुळे ग्राहक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण बिल एकत्रित भरल्यास दोन टक्क्यांची सूट दिली जाईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी करून वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.ऊर्जामंत्री राऊत यांनी मंगळवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. लॉकडाऊनमुळे मूळ गावी गेल्यामुळे अनेक घरगुती ग्राहकांचा वीजवापर कमी झाला. तरीही मीटर रीडिंग न घेतल्यामुळे मागील वीजवापरानुसार त्यांना सरासरी वीजबिल देण्यात आले, अशा ग्राहकांच्या मीटरचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन, त्यांचे वीजबिल दुरुस्त करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील आठवड्यात तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलांमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी राऊत यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.अशी मिळणार सवलत
- घरगुती ग्राहकांसाठी ३ हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची सवलत.
- महावितरणच्या कार्यालयात जाण्याची ग्राहकांना गरज नाही.
- कुठल्याही वीजबिल भरणा केंद्रावर जाऊन कमीत कमी बिलाच्या १/३ रक्कम भरता येईल.
- संपूर्ण वीजबिल एकाच वेळी भरल्यास २ टक्क्यांची सवलत.
- ज्यांनी यापूर्वी संपूर्ण रकमेचे बिल भरले असेल त्यांनाही सवलत मिळणार.