'त्या' शेतकऱ्याशी कृषिमंत्र्यांची 2 तास चर्चा, पदभार स्विकारण्यापूर्वीच केलं काम 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 11:43 AM2020-01-07T11:43:56+5:302020-01-07T11:46:58+5:30

महेंद्र देशमुख यांनी बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतल्याचे बँकेचे म्हणणे असून बँकेचा व्यवहार मान्य नसल्याचे देशमुख

2 hours discussion of agriculture ministers with 'that' farmer, work before taking charge | 'त्या' शेतकऱ्याशी कृषिमंत्र्यांची 2 तास चर्चा, पदभार स्विकारण्यापूर्वीच केलं काम 

'त्या' शेतकऱ्याशी कृषिमंत्र्यांची 2 तास चर्चा, पदभार स्विकारण्यापूर्वीच केलं काम 

Next

मुंबई - पनवेल तालुक्यातील आपटा शाखेच्या बँक ऑफ इंडियाने फसवणूक केल्याचा आरोप करीत आंदोलन करणाऱ्या, मातोश्रीवर जाताना पोलिसांकडून अडवणूक झालेल्या महेंद्र देशमुख या शेतकऱ्याची कैफियत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी ऐकून घेतली. या प्रकरणाची त्रिसदस्यीय समितीमार्फत आठ दिवसांत चौकशी करण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कृषि विभागाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच एका शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याची भावना कृषिमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

महेंद्र देशमुख यांनी बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतल्याचे बँकेचे म्हणणे असून बँकेचा व्यवहार मान्य नसल्याचे देशमुख यांनी कृषिमंत्र्यांना सांगितले. देशमुख यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याचे गांभीर्य ओळखून कृषिमंत्री भुसे यांनी तातडीने देशमुख यांना कुटुंबियांसह निवासस्थानी बोलवून घेतले. त्यांच्यासोबत सुमारे दोन तास चर्चा केली. त्यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, पनवेलचे तहसिलदार अमित सानप, बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापक आणि अन्य अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन देशमुख यांना लवकरात लवकर न्याय कसा मिळेल याबाबत सूचना केल्या. कृषिमंत्र्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत या प्रकरणाची अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक आणि लेखा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे चौकशी करुन आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी कृषिमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांची आस्थेने चौकशी करत त्यांना दिलासा दिला.

मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी लहान मुलीसह पोलिसांच्या ताब्यात

सवणे येथील महेंद्र देशमुख यांचे बँक ऑफ इंडियाच्या आपटे शाखेत खाते आहे. त्यात त्यांची काही रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये होती. 2006 मध्ये यांनी वीटभट्टीसाठी दोन लाखाचे कर्ज घेतले होते. याची मुदत वाढवून 2008 पर्यंत त्यांनी आठ लाखांचे कर्ज आपटे शाखेतून घेतल्याचे बँकेचे म्हणणे आहे. जर मी कर्ज घेतले असते, तर बँक आठ वर्षे थांबली असती का असा प्रश्न देशमुख यांनी विचारला. बँकेने देशमुख यांच्या सावणे येथील 1302 चौरस फुटाच्या घरावर आठ लाखांच्या कर्जाचा बोजा चढवला.

'त्या' शेतकऱ्याला मातोश्रीनंतर पनवेल तहसील कार्यालयातही रोखले

2008 ला कर्ज घेतले असेल तर 2009 ला बोजा चढवायचे कारण काय असाही प्रश्न देशमुख यांनी केला. देशमुख व त्यांची पत्नी सरिता यांच्या नावे असलेले दोन लाख 80,000 रुपये बँकेने न विचारताच वळते करून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. पोटाला चिमटे देऊन पै पै जमा केली आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी ती परस्पर वळवली, हा अन्याय असल्याचे म्हणणे देशमुख यांनी तहसीलदार डॉ अमित सानप यांच्यासमोर मांडले. याबाबत देशमुख, तहसीलदार डॉ. अमित सानप, आपटा बँक शाखेचे अधिकारी कृषीमंत्री दादा भिसे यांना रात्री भेटले.
 

Web Title: 2 hours discussion of agriculture ministers with 'that' farmer, work before taking charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.