विमानतळावर २ किलो सोने जप्त
By admin | Published: January 23, 2017 04:16 AM2017-01-23T04:16:15+5:302017-01-23T04:16:15+5:30
येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून रविवारी पहाटे आलेल्या एका विमानातील प्रवाशाकडून ६० लाख रुपये किमतीचे
मुंबई : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून रविवारी पहाटे आलेल्या एका विमानातील प्रवाशाकडून ६० लाख रुपये किमतीचे २ किलो २४९ ग्रॅम सोने व दोन आयफोन जप्त केले. अहमद तमीज व अर्शद एमपी यांना या प्रकरणी अटक केली आहे.
दुबईहून मुंबईत इमिरेट्स एअरवेज - ५०६ या विमानातून आलेल्या प्रवाशांच्या साहित्याची तपासणी करीत असताना तमीजच्या नावे असलेल्या बॅगमध्ये वॉशिंग मशिनमधील सिलिंडरच्या आकारात २.२४९ किलो सोन्याची बिस्किटे व दोन आयफोन लपविले होते. सोन्याची किंमत ६० लाख ९१ हजार ९१२ रुपये तर आयफोनची किंमत १ लाख २० हजार
असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तमीज हा सगळा ऐवज अर्शद नावाच्या व्यक्तीकडे देणार होता. विमानतळ परिसरातूनच त्याला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)