संलग्नित महाविद्यालयातील २ लाख ९ हजार ४२९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 01:42 AM2020-10-09T01:42:29+5:302020-10-09T01:42:33+5:30
विद्यापीठ विभागातून १ हजार ६७३ विद्यार्थी
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील २ लाख ९ हजार ४२९ एवढ्या विद्यार्थ्यांनी मागील दोन दिवसांत यशस्वीरीत्या परीक्षा दिल्या. बुधवारी अंतिम वर्ष/सत्राच्या झालेल्या कला, विज्ञान आणि वाणिज्य विषयांच्या परीक्षांसाठी १ लाख १ हजार ५३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षांना १ लाख ३ हजार २१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर विधीच्या परीक्षेसाठी २ हजार ७८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, या परीक्षांसाठी २ हजार ८४३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. अभियांत्रिकीसाठी १ हजार ३११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून या परीक्षांना १ हजार ३३४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. अशा एकूण १ लाख ५ हजार ६२७ एवढ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या परीक्षा दिली. तर विद्यापीठ विभागातून ८२४ विद्यार्थ्यांनी विविध विषयांच्या परीक्षा दिल्या, यासाठी ९८५ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
गुरुवारी झालेल्या परीक्षा अत्यंत सुरळीतरीत्या पार पडल्या. कला, विज्ञान आणि वाणिज्य विषयांच्या या परीक्षांना ७८ हजार ९९ एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षांना ७८ हजार ९०७ एवढे विद्यार्थी बसले होते. तर विधीच्या परीक्षेसाठी १ हजार ६०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून या परीक्षांसाठी १ हजार ६२६ विद्यार्थी बसले होते. अभियांत्रिकीसाठी २४ हजार १०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून या परीक्षांना २४ हजार १३३ विद्यार्थी बसले होते. तर विद्यापीठ विभागातून ८४९ एवढ्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या परीक्षा दिल्या असून यासाठी ८४९ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. इतर विद्यार्थी काही कारणाने गैरहजर होते. परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी त्या-त्या महाविद्यालयांच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या नियंत्रण कक्षातील ०२२-२६५३२०३४ या क्रमांकावरही संपर्क साधता येऊ शकणार आहे.
शंकांसाठी संपर्क क्रमांक
काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणाने एखादा विद्यार्थी परीक्षेला बसू शकला नसेल, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
अडचण आल्यास ०२२-२६५३२०३४ या क्रमांकांवरही संपर्क साधता येईल.