Join us

लठ्ठ लोकांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर 2 लाख कोटींचा ताण

By admin | Published: November 26, 2014 2:19 AM

आर्थिक स्थैर्य आल्यावर माणसाच्या गरजा वाढत जातात. इतर गरजांप्रमाणो अन्नाची मागणीही वाढत जाते. अन्न सेवनाचे प्रमाण वाढते, मात्र शारीरिक हालचाली मंदावतात.

मुंबई : आर्थिक स्थैर्य आल्यावर माणसाच्या गरजा वाढत जातात. इतर गरजांप्रमाणो अन्नाची मागणीही वाढत जाते. अन्न सेवनाचे प्रमाण वाढते, मात्र शारीरिक हालचाली मंदावतात. यामुळे लठ्ठपणा वाढत जातो. आजघडीला जागतिक अर्थव्यवस्थेला लठ्ठ लोकांमुळे 2 लाख कोटी रुपयांचा ताण सहन करावा लागत असल्याचे मॅकेन्सीने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. 
मॅकेन्सीने जागतिक पातळीवर केलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, जगातील 21क् कोटी व्यक्ती लठ्ठ असून, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 5 टक्के नागरिक हे लठ्ठपणाच्या संबंधित आजारांमुळे मरण पावतात. इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी वैद्यकीय शास्त्रत नवनवीन तंत्रज्ञान, शस्त्रक्रिया विकसित झाल्या आहेत. मात्र, लठ्ठपणा कमी करण्यासाठी यापेक्षाही नैसर्गिक पद्धतीचा वापर करणो अथवा लठ्ठपणा येऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणो योग्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणो आहे.
स्थूल, लठ्ठ व्यक्तीला वजन कमी करणो ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. खूप प्रयत्न करूनही काही वेळा वजन कमी झाले नाही की व्यक्ती तणावाखाली येते. सध्या वैद्यकीय क्षेत्रत वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया आहे. यामध्ये व्यक्तीची भूक कमी केली जाते. ही शस्त्रक्रिया सरसकट लठ्ठ व्यक्तींवर करणो योग्य नाही. बॉडी मास इंडेक्स तपासूनच शस्त्रक्रिया करणो योग्य आहे. काही व्यक्तींना ही शस्त्रक्रिया फायदेशीर आहे, मात्र सर्वानाच ही शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते, असे जठरांत्रतज्ज्ञ डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले. 198क्मध्ये भारतात लठ्ठ व्यक्तींचे प्रमाण 9 टक्के होते. तर 2क्14मध्ये लोकसंख्येपैकी 13 टक्के व्यक्ती लठ्ठ झाल्या आहेत. लठ्ठपणा वाढल्यामुळे शरीरातील चरबी वाढते, यामुळे रक्तवाहिन्यांमधून होणा:या रक्त प्रवाहात अडथळा येतो. यामुळेच हृदयविकार होण्याचा धोका वाढतो. लठ्ठपणामुळे व्यक्तींनी हालचाल कमी केल्यास त्याचा भार हृदयावर येतो, असे हृदय शल्यविशारद डॉ. पवन कुमार यांचे म्हणणो आहे.
 
लठ्ठपणा नैसर्गिकरीत्याच कमी करा!
लठ्ठपणा कमी करण्यासाठी केल्या जाणा:या शस्त्रक्रियेसाठी भारतामध्ये पदव्युत्तर विशेष अभ्यासक्रम नाही. शल्यविशारद ही शस्त्रक्रिया करू शकतात. मात्र, ही शस्त्रक्रिया करण्याआधी आणि नंतर काळजी घेणो अत्यंत गरजेचे आहे. शस्त्रक्रियेनंतर योग्य ती काळजी न घेतल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. 6 महिन्यांपूर्वी ही शस्त्रक्रिया केल्यावर एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. शस्त्रक्रियेनंतर योग्य ती काळजी न घेतल्यामुळे त्या डॉक्टरचे सहा महिन्यांसाठी निलंबन केले होते.
 
लठ्ठपणा कसा टाळू शकता?
दररोज किमान अर्धा तास व्यायाम करा
दोन्ही वेळचे जेवण टाळू नका
अवेळी खाण्याची सवय असल्यास ती बदला
पॅकबंद खाद्यपदार्थ खाणो टाळा
आहारात ताज्या भाज्या, फळे यांचा समावेश करा;  प्राणायाम करा
 
कशामुळे येतो लठ्ठपणा?
अतिसकस, पौष्टिक आहाराचे सेवन
भरपूर प्रमाणात गोड, तेलकट पदार्थ खाणो
अतिप्रमाणात थंड पदार्थ खाणो
अवेळी जेवण करणो
सतत दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर करणो
रात्री उशिरा जड अन्नपदार्थ खाणो
सतत मानसिक ताण घेणो