मुंबई : वीज मीटर रीडिंग स्वतःहून पाठविण्यास ग्राहकांकडून प्रतिसाद वाढत असून, एप्रिल महिन्यात २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी मोबाईल ॲप, वेबसाईट व एसएमएसद्वारे मीटरचे रीडिंग पाठविले आहे. यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक ४९ हजार ९५० तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील २८ हजार ९१६ वीज ग्राहकांचा समावेश आहे.
मार्च महिन्यात १ लाख ३५ हजार २६१ ग्राहकांनी मीटर रीडिंग पाठविले होते. या ग्राहकांमध्ये एप्रिल महिन्यात ६७ हजार ४८१ संख्येने वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरच्या रीडिंगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवसआधी रीडिंग पाठविण्याची एसएमएसद्वारे विनंती करण्यात येत आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविता येत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात राज्यातील २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी स्वतःहून मीटर रीडिंग पाठविलेले आहे.
---------------
परिमंडल आणि रीडिंग पाठविणारे ग्राहक
पुणे ४९९५०
कल्याण २८९१६
नाशिक २२३३०
भांडूप १८०९३
बारामती १३७३३
जळगाव १०८७७
औरंगाबाद १०१००
कोल्हापूर ८४७०
नागपूर ७२६९
अकोला ७१८०
लातूर ६०८५
अमरावती ५६६२
कोकण ४२२३
गोंदिया ३४६४
नांदेड ३२६२
चंद्रपूर ३१३८