वर्षभरात ६ मेळाव्यांतून देणार २ लाख रोजगार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 08:23 AM2024-02-06T08:23:26+5:302024-02-06T08:24:08+5:30

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : छ. संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोकण विभागांत होणार मेळावे

2 lakh jobs will be provided through 6 meetings in a year | वर्षभरात ६ मेळाव्यांतून देणार २ लाख रोजगार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

वर्षभरात ६ मेळाव्यांतून देणार २ लाख रोजगार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात नमो महारोजगार मेळाव्यातून २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोकण विभागांमध्ये महारोजगार मेळावे आयोजित करण्यास सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

यापूर्वी नागपूर येथे प्रथमच राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन चालू वर्षी प्रत्येक महसुली विभागात एक याप्रमाणे सहा नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मेळाव्यांमार्फत राज्यातील किमान दोन लाख उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येतील. या मेळाव्यांसाठी प्रति मेळावा पाच कोटी याप्रमाणे तीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मेळाव्यांसाठी विविध विभागांवर जबाबदारी देण्यात आली आहे. हाेतकरू तरुणांपर्यंत पाेहचण्यासाठी उद्योजक, समाजसेवक आणि स्वयंसेवी संघटनांचा सहभाग घेतला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या मालमत्ताधारकांना यावर्षीदेखील मालमत्ता करात वाढ न करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

मुख्यमंत्री वयोश्री योजना
nज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री ‘वयोश्री’ योजनेसही मान्यता देण्यात आली. २ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे. 
nज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व तपासणीनंतर पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ बँक खात्यात जमा हाेतील. यासाठी ४८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

 

Read in English

Web Title: 2 lakh jobs will be provided through 6 meetings in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.