Join us

मुंबईत 2 लाख स्किझोफ्रेनियाग्रस्त

By admin | Published: May 24, 2016 10:12 AM

महाविद्यालयातील काही विद्यार्थी एकाकी राहतात, कधीकधी स्वत:च्या विश्वात रमलेले दिसतात. हे बदल त्यांच्यात अचानक झालेले असतात, तरीही या बदलांकडे दुर्लक्ष केले जाते

जागतिक स्क्रिझोफ्रेनिया दिन : मानसोपचारतज्ज्ञांची कमतरता
 
मुंबई : महाविद्यालयातील काही विद्यार्थी एकाकी राहतात, कधीकधी स्वत:च्या विश्वात रमलेले दिसतात. हे बदल त्यांच्यात अचानक झालेले असतात, तरीही या बदलांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेकदा स्क्रिझोफ्रेनियाग्रस्त रुग्णांवर उपचार होत नाहीत. मुंबईत सुमारे 2 लाख स्किझोफ्रेनियाग्रस्त असून, राज्यात 10 लाख रुग्ण आहेत.  
अनेकदा स्किझोफ्रेनियाची लक्षणो आढळूनही कुटुंबहय या रुग्णांकडे दुर्लक्ष करतात. सर्वसाधारणपणो 13 ते 20 वयोगटातील मुलांना आणि 22 ते 30 वयोगटातील मुलींना स्किझोफ्रेनिया हा आजार जडतो. स्किझोफ्रेनिया हा आजार अनुवांशिक आणि आजूबाजूच्या परिस्थितीमुळेही होऊ शकतो.  तज्ज्ञ डॉक्टरच त्यांच्यावर औषधोपचार करू शकतात, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. 
स्किझोफ्रेनिया रुग्णांची संख्या अधिक असली तरी त्यांच्यावर उपचार करणा:या मानसोपचार तज्ज्ञांची संख्या कमी आहे. ठाण्यातील ‘मेंटल हॉस्पिटल’मध्ये स्किझोफ्रेनियाचे अधिक रुग्ण असतात. तर, मुंबईतील केईएम, नायर, सायन आणि जेजे रुग्णालयातदेखील स्किझोफ्रेनिया रुग्णांना दाखल करून उपचार केले जातात. या रुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देण्याची आवश्यकता असते. पूर्ण राज्यात फक्त चार ‘मेंटल हॉस्पिटल्स’ आहेत. या रुग्णालयांत 29 मानसोपचार तज्ज्ञांचा जागा आहेत. पण, त्यापैकी 11 जागा भरलेल्या असून, 19 जागा रिक्त आहेत. सरकारने सुरू केलेल्या ‘प्रेरणा प्रकल्पा’त 14 जिल्ह्यांत मानसोपचारतज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार होती. पण, अजूनही जालना, हिंगोली आणि वाशिम येथे मानसोपचारतज्ज्ञ नेमण्यात आलेले नाहीत, असे डॉ. मुंदडा यांनी सांगितले. 
स्किझोफ्रेनिया आजारात रुग्णांची काळजी हा औषधोपचाराइतकाच महत्त्वाचा भाग असतो. या आजारात कुटुंबीयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधांची आवश्यकता असते. पण, त्याचबरोबर त्यांना या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी तसे आजूबाजूचे वातावरण असणोही आवश्यक असते. कुटुंबीयांनी या व्यक्तींना समजून घेणो आवश्यक असते. त्याचबरोबर या व्यक्तींना वेळच्यावेळी औषध देणो, त्यांना तपासणीसाठी नेणो हे अत्यंत महत्त्वाचे असते. फॉलोअपमुळे या रुग्णांमध्ये चांगला बदल दिसून येतो. या रुग्णांना एकाकी न पाडता त्यांच्याशी संवाद साधणो आवश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. युसुफ माचिसवाला यांनी सांगितले.
 
 
स्किझोफ्रेनिया दिन 
जागतिक स्किझोफ्रेनिया दिन हा स्किझोफ्रेनिया आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. यंदाची संकल्पना ‘दैनंदिन जीवनातील मानसिक आरोग्य’ अशी आहे.  
 
स्किझोफ्रेनियाची सामान्य लक्षणो
एकाकी राहणो, लोकांशी संवाद न साधणो, स्वत:शी बडबड करणो, मित्र-मैत्रिणींशी संपर्क तोडणो, सामाजिक कार्यात सहभागी न होणो, स्वच्छता न राखणो, स्वत:च्या दिसण्याकडे लक्ष न देणो, आंघोळ करण्याचा सतत कंटाळा करणो, आवाज ऐकू येणो, सतत दुस:यांवर संशय घेणो, वागण्यात बदल होणो.
 
 
डॉक्टरांकडे नेणे आवश्यक
 
- अनेकदा मुलांना 11वी, 12वी या वर्षात स्किझोफ्रेनिया हा आजार जडतो. आजार प्राथमिक अवस्थेत असताना मुलांच्या वागण्यात-बोलण्यात बदल दिसून येतात. मुले एकाकी राहतात. पण, या बदलाकडे कुटुंबीयांकडून दुर्लक्ष करण्यात येते. 
 
- बहुतांश कुटुंबे आपल्या पाल्याला स्किझोफ्रेनिया झाला असल्याचे मान्यच करीत नाहीत. स्किझोफ्रेनिया आजाराची लक्षणो आढळल्यास पालक पाल्यांना ओरडतात, त्यांच्यावर रागवतात. 
 
- पालकांनी स्किझोफ्रेनिया झाल्याचे मान्य केले पाहिजे. डॉक्टरांकडे नेऊन उपचार सुरू करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. 
 
 (प्रतिनिधी)