२ हजार १११ वाहने तीन वर्षांत चोरीस

By admin | Published: March 22, 2015 12:28 AM2015-03-22T00:28:00+5:302015-03-22T00:28:00+5:30

रस्त्यालगत अथवा घरासमोरील उभी असलेली वाहने चोरट्यांकडून लक्ष्य केली जात असून गेल्या तीन वर्षांत शहरातून २ हजार ११ वाहने चोरीला गेली आहेत.

2 thousand 111 vehicles stolen in three years | २ हजार १११ वाहने तीन वर्षांत चोरीस

२ हजार १११ वाहने तीन वर्षांत चोरीस

Next

सूर्यकांत वाघमारे ल्ल नवी मुंबई
रस्त्यालगत अथवा घरासमोरील उभी असलेली वाहने चोरट्यांकडून लक्ष्य केली जात असून गेल्या तीन वर्षांत शहरातून २ हजार ११ वाहने चोरीला गेली आहेत. वाहनचोर टोळ्यांवर कारवाईनंतरही वाहनांचा थांगपत्ता लागत नसल्याने केवळ ५३४ वाहनांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले.
वाहनस्थळाअभावी मोठ्या संख्येने रस्त्यालगत वाहने उभी केली जातात. अशावेळी वाहनमालकांकडून होणारा निष्काळजीपणे परिणाम मालकांना भोगावे लागतात. रस्त्यालगत अथवा घरासमोर मोकळ्या जागेत उभी केलेली वाहने सातत्याने चोरीला जात आहेत. अनेक टोळ्यांवर पोलिसांनी कारवाई करूनही वाहनचोरीच्या घटना मात्र कमी झालेल्या नाहीत. यामुळे शहरात वाहनचोर टोळ्यांची दहशत निर्माण झाली आहे. या टोळ्यांनी गेल्या तीन वर्षांत ट्रक, कार व दुचाकी यासारखी २ हजार १११ वाहने चोरली आहेत. यात मोटारसायकलींची संख्या सर्वाधिक आहे. त्यापैकी ६५४ वाहने २०१४ मध्ये चोरीला गेली आहेत. त्यामध्ये ८७ ट्रक, १७६ कार व ३९१ मोटारसायकलींचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांत चोरीला गेलेल्या २ हजार १११ वाहनांमध्ये १ हजार १३६ मोटारसायकली आहेत. कोणत्याही ठिकाणावरून सहज चोरता येणे शक्य असल्याने मोटरसायकलींवर चोरट्यांचे अधिक लक्ष असते. त्यानुसार रेल्वे स्थानकासमोरून, मॉलबाहेरून मोटारसायकली अधिक चोरीला जात आहेत. पार्किंगसाठी सुरक्षित जागेचा वापर केल्यास हे प्रकार देखील टळू शकतात. मात्र केवळ प्रत्येकाच्या मानसिकतेमुळे असुरक्षित ठिकाणीच व रस्त्यालगत वाहने उभी होत असल्याने चोरट्यांचेही फावत आहे.(प्रतिनिधी)

च्पोलिसांच्या या कारवायांमध्ये राज्याबाहेरच्याच टोळ्या असल्याचे समोर आले. नवी मुंबई, मुंबई व ठाणे परिसरातून चोरलेली ही वाहने बनावट कागदपत्रांच्या आधारे कमी किमतीत परराज्यात विकली जात आहेत. अशाच एका टोळीला एपीएमसी पोलिसांनी नुकतीच जालना येथून अटक देखील केलेली आहे.
च्मात्र अशा टोळ्यांवर कारवाया करूनही त्यांच्याकडून चोरीचे वाहन जप्तीचे (रिकव्हरी) प्रमाण मात्र कमीच आहे. गत तीन वर्षांत चोरीला गेलेल्या २ हजार १११ वाहनांपैकी अवघ्या ५३४ वाहनांचा शोध पोलिसांना लागलेला आहे. त्यापैकी १४२ वाहने सन २०१४ च्या घटनांमधील आहेत.

जी.पी.एस. सारखी यंत्रणा आवश्यक
बनावट चावीच्या आधारे ही वाहने चोरली जात असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. महागड्या वाहनांमध्ये जी.पी.एस. सारखी यंत्रणा बसवल्यास चोरीला गेलेले वाहन शोधणे शक्य असते. परंतु लाखो रुपये किमतीची वाहने वापरताना अवघ्या हजार रुपयांचे सुरक्षेचे उपकरण बसवण्यास वाहनमालकांची उदासीनता दिसून येते, तर मोटारसायकलच्या सुरक्षेबाबत पुरेशी उपाययोजना नसल्याने चोरट्यांचे त्यावर अधिक लक्ष असते.

Web Title: 2 thousand 111 vehicles stolen in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.