गणेशोत्सवासाठी एसटीच्या २ हजार २२५ जादा गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 01:35 AM2018-07-31T01:35:57+5:302018-07-31T01:36:34+5:30

गणेशोत्सवात मुंबईतील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील मूळ गावी जाण्यासाठी एसटीने २ हजार २२५ जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 2 thousand 225 additional trains for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी एसटीच्या २ हजार २२५ जादा गाड्या

गणेशोत्सवासाठी एसटीच्या २ हजार २२५ जादा गाड्या

googlenewsNext

मुंबई : गणेशोत्सवात मुंबईतील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील मूळ गावी जाण्यासाठी एसटीने २ हजार २२५ जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गणेशोत्सवासाठीच्या या सेवेची संगणकीय आरक्षण सुविधा ९ आॅगस्टपासून सुरू होईल. या वर्षी प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आपल्या इतर विभागांकडून गणेशोत्सवासाठी २ हजार २२५ गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रुप बुकिंग (सामूहिक आरक्षण) करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा १ आॅगस्टपासून उपलब्ध होईल.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ८ ते ९ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बस स्थानके व बस थांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. गणेशोत्सवासाठी एसटीच्या २ हजार २२५ जादा गाड्या धावतील. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी ‘वाहन दुरुस्ती पथक’ (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात येतील. कोकणातील सावंतवाडी, मालवण, कणकवली, देवगड, विजयदुर्ग, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, श्रीवर्धन, पेण, अलिबाग व आजूबाजूच्या परिसरातील प्रवाशांसाठी ही चांगली सोय आहे.

- गणेशभक्तांनी सुरक्षित प्रवासासाठी आपल्या प्रवासाची तारीख व वेळ ठरवून संबंधित आगारांशी संपर्क साधावा. रा. प. बसेसचे आरक्षण करावे, सुखरूप प्रवासाच्या दृष्टीने कोकणातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.

Web Title:  2 thousand 225 additional trains for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.