मुंबईत २ हजार ७६० सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:08 AM2021-08-20T04:08:43+5:302021-08-20T04:08:43+5:30

मुंबई : मुंबईत गुरुवारी २८३ रुग्ण आणि पाच जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २०३ रुग्ण बरे ...

2 thousand 760 active patients in Mumbai | मुंबईत २ हजार ७६० सक्रिय रुग्ण

मुंबईत २ हजार ७६० सक्रिय रुग्ण

Next

मुंबई : मुंबईत गुरुवारी २८३ रुग्ण आणि पाच जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ७ लाख १९ हजार १५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २ हजार ७६० रुग्ण सक्रिय आहेत.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे, तर १२ ते १८ आगस्टपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.०३ टक्के आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ २ हजार ५४ दिवसांवर आला आहे. शहर-उपनगरात ७ लाख ४० हजार २९० कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा १५ हजार ९३५ झाला आहे. शहर-उपनगरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २६ आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील १ हजार ५६६ सहवासितांचा शोध घेतला आहे. दिवसभरात पालिकेने ५२ हजार ४८२ चाचण्या केल्या असून आतापर्यंत ८७ लाख ९८ हजार ४३९ कोरोना चाचण्या केल्या आहेत.

Web Title: 2 thousand 760 active patients in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.