राज्यातील घरगुती ग्राहकांनी थकविले २ हजार ७७८ कोटींचे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:06 AM2021-02-14T04:06:57+5:302021-02-14T04:06:57+5:30

महावितरणची आकडेवारी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वीज बिलाची थकबाकी वाढत असून, ३३ लाख ४८ हजार घरगुती ग्राहकांनी महावितरणचे ...

2 thousand 778 crore electricity bill exhausted by domestic consumers in the state | राज्यातील घरगुती ग्राहकांनी थकविले २ हजार ७७८ कोटींचे वीज बिल

राज्यातील घरगुती ग्राहकांनी थकविले २ हजार ७७८ कोटींचे वीज बिल

Next

महावितरणची आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वीज बिलाची थकबाकी वाढत असून, ३३ लाख ४८ हजार घरगुती ग्राहकांनी महावितरणचे २ हजार ७७८ कोटींचे बिल भरलेले नाही. शेतकऱ्यांकडील कृषी पंपांच्या बिलाची थकबाकी ४५ हजार कोटी आहे.

राज्याला दरवर्षी किमान १२ हजार कोटींचा खर्च केवळ कोळसा आणि तेल यांच्या खरेदी व वाहतुकीवर करावा लागतो. सरकारला दरवर्षी सरासरी ९ हजार २०० कोटी खर्च करून केंद्र सरकारकडून कोळसा विकत घ्यावा लागतो. दरवर्षी रेल्वेद्वारा कोळशाच्या होणाऱ्या वाहतुकीवर सरासरी २६०० कोटी खर्च येतो. दरवर्षी सरासरी ३०० कोटी रुपये केंद्र सरकारकडून तेल विकत घेऊन तो वीज निर्मिती केंद्रापर्यंत वाहून नेण्यावर खर्च होतो. म्हणजे सरकारला दरवर्षी सरासरी १२ हजार कोटी रुपये कोळसा व तेल खरेदी व वाहतुकीवर खर्च करावा लागतो.

---------------

- मार्च २०१४ मध्ये १४ हजार १५४ कोटींवर असलेली महावितरणची थकबाकी मार्च २०२० ला ५१ हजार १४६ कोटींवर पोहोचली आहे.

- ५ वर्षांच्या काळात थकबाकी ३७ हजार कोटींनी वाढली.

- दरवर्षी ७ हजार कोटींनी थकबाकी वाढली.

- कोरोना काळात ही थकबाकी ८ हजार कोटींनी वाढली.

---------------

वर्षनिहाय थकबाकी ( कोटी )

२०१४ - १४,१५४

२०१५ - १६,५२५

२०१६ - २१,०५९

२०१७ - २६,३३३

२०१८ - ३२,५९१

२०१९ - ४१,१३३

२०२० - ५१,१४६

डिसेंबर २०२० - ७१,५०६

---------------

१ एप्रिल २०२० ते १३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत

ग्राहक श्रेणी थकबाकीदार ग्राहक संख्या एकूण थकबाकी (कोटीत)

१. लघुदाब-घरगुती ३३,४८,७५८ २,७७८

२.लघुदाब-वाणिज्य २,६४,१६८ ४८२

३. लघुदाब-औद्योगिक ३९,२२४ १८१

एकूण ३६,५२,१५० ३,४४१

---------------

Web Title: 2 thousand 778 crore electricity bill exhausted by domestic consumers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.