मुंबई : मुंबईत शनिवारी २५९ रुग्णांची नोंद झाली असून ५ मृत्यूची नोंद झाली आहे. २८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो २ हजार २३ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या २ हजार ८२५ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख ४० हजार ८७१ वर पोहोचला आहे, मृतांचा आकडा १५ हजार ९४६ वर पोहोचला आहे. शहर उपनगरात रुग्ण बरे होण्याची संख्या ७ लाख १९ हजार ६६२ वर पोहोचली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. मुंबई चाळ आणि झोपडपट्टीच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही, २४ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ३४ हजार ८८३ तर आतापर्यंत एकूण ८८ लाख ८९ हजार ८८८ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.