मुंबईत २ हजार ८३४ रुग्ण उपचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:09 AM2021-08-17T04:09:52+5:302021-08-17T04:09:52+5:30
मुंबई : मुंबईत रविवारी २६७ रुग्ण तर ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ३०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...
मुंबई : मुंबईत रविवारी २६७ रुग्ण तर ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ३०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून, १ हजार ९२१ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या २ हजार ८३४ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख ३९ हजार ३३६ वर पोहोचला आहे, मृतांचा आकडा १५ हजार ९८९ वर गेला आहे. आतापर्यंत एकूण ७ लाख १८ हजार ८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहर उपनगरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के झाले आहे.
मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही, तर २२ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ३५ हजार ७ तर आतापर्यंत एकूण ८६ लाख ५२ हजार २६२ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.