‘दुष्काळग्रस्तांसाठी २ हजार ९०० कोटी’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 03:04 AM2019-01-25T03:04:28+5:302019-01-25T03:04:34+5:30
दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ७ हजार ९०० कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे.
Next
मुंबई : दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ७ हजार ९०० कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. मात्र तोपर्यंत राज्य सरकारने २,९०० कोटींचा निधी विभागीय आयुक्तस्तरावर वितरित केला आहे. लवकरच तो शेतकºयांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी दिली. मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, दुष्काळी भागात मंडल स्तरावर चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. एका छावणीत साधारण ३०० ते ५०० जनावरांचा समावेश असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.