Join us

तीनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर कसा असेल परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 9:50 AM

रविवार, २० ऑगस्ट रोजी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे यासाठी रविवार, २० ऑगस्ट रोजी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. 

मध्य रेल्वे कुठे? : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, कधी? : सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५  पर्यंत.

परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या  मार्गावर वळविण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. 

हार्बर रेल्वे कुठे?  : कुर्ला-वाशी  अप आणि डाऊन मार्गावर, कधी? : सकाळी ११:१० ते  दुपारी ४:१० वाजेपर्यंत.

परिणाम : ब्लॉक कालावधीत वाशी, बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालविल्या जातील. 

पश्चिम रेल्वे कुठे? : बोरिवली - भाईंदर अप-डाऊन धीम्या, डाऊन जलद मार्गावर, कधी? : वेळ - रात्री १२:४० ते  पहाटे ४:४० वाजेपर्यंत.

परिणाम : ब्लॉक कालावधीत अप धीम्या मार्गावरील सर्व गाड्या विरार-वसई रोड ते बोरिवली दरम्यान अप जलद मार्गावर चालविल्या जातील व सर्व डाऊन जलद मार्गावरील लोकल गोरेगाव ते वसई रोड/विरार स्थानकादरम्यान डाऊन धिम्या मार्गावर चालविल्या जातील.

 

टॅग्स :पश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वेमुंबई लोकल