अल्पसंख्याक युवांच्या प्रशिक्षणासाठी २० कोटींचा निधी - नवाब मलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:24 AM2020-12-12T04:24:31+5:302020-12-12T04:24:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील युवक आणि महिलांना स्थानिक व्यावसायिक आणि औद्योगिक गरजांनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण ...

20 crore fund for training of minority youth - Nawab Malik | अल्पसंख्याक युवांच्या प्रशिक्षणासाठी २० कोटींचा निधी - नवाब मलिक

अल्पसंख्याक युवांच्या प्रशिक्षणासाठी २० कोटींचा निधी - नवाब मलिक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील युवक आणि महिलांना स्थानिक व्यावसायिक आणि औद्योगिक गरजांनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी २० कोटी रुपये खर्च होणार असून आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. यंदा पहिल्या टप्प्यात ११ हजार ७६४ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी, जैन आणि ज्यू समुदायातील १५ ते ४५ वयोगटातील युवक आणि महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. बँकिंग आणि टॅक्स असिस्टंट, हेल्थ केअर, बांधकाम, लॉजिस्टीक्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, ॲनिमेशन आणि मल्टीमीडिया (असिस्टंट कॅमेरामन), ऑटोमोबाइल, मोटार मेकॅनिक हेवी व्हेईकल, रोड रोलर ड्रायव्हर, जेसीबी ड्रायव्हर यांसह स्थानिक व्यवसाय, स्थानिक उद्योग यांच्या गरजांनुसार हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. साधारण ३०० ते ६०० तासांचा प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीकृत संस्थांची निवड करून त्यांच्यामार्फत हे प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी तातडीने संस्थांची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ही प्रशिक्षणे सुरू करण्यात येतील, असेही मंत्री मलिक यांनी सांगितले.

या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील युवक आणि महिला लोकसंख्येच्या आधारे प्रशिक्षणार्थींची संख्या निश्चित करण्यात आली आहे. एका बॅचमध्ये ३० जण याप्रमाणे एकूण ११ हजार ७६४ उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी सुमारे १७ हजार रुपये खर्च होणार आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले. प्रशिक्षणानंतर उमेदवारांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत कार्यवाही करण्यात येईल. तसेच उमेदवारांना सेक्टर स्किल कौन्सिल यांच्यामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

-------

जिल्हानिहाय उमेदवार संख्या

जिल्हा-बॅच-उमेदवार

मुंबई उपनगर- ५०-१५०९

ठाणे- ३५-१०७०

औरंगाबाद- २१-६३७

पुणे- २०-६१८

मुंबई शहर- १९-५७३

नागपूर- १९-५६८

नांदेड- १७-५१०

नाशिक- १६-४८२

अमरावती- १५-४६७

जळगाव- १४-४२८

बुलडाणा- १४-४१४

अकोला- १३-४०७

परभणी- १०-२९८

यवतमाळ- ९-२८०

सोलापूर- ९-२७८

लातूर- ९-२६०

जालना- ८-२५१

कोल्हापूर- ७-२३१

बीड- ७-२२६

अहमदनगर- ७-२१७

चंद्रपूर- ७-२११

रायगड- ६-१९४

वाशिम- ६-१८७

हिंगोली- ६-१८२

सांगली- ६-१७९

रत्नागिरी- ५-१५२

सातारा- ५-१४९

धुळे- ४-१२३

उस्मानाबाद- ४-१२०

वर्धा- ४-११६

भंडारा- ३-८९

नंदुरबार- ३-८३

गोंदिया- ३-७९

गडचिरोली- २-७५

पालघर- २-६९

सिंधुदुर्ग- १-३३

Web Title: 20 crore fund for training of minority youth - Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.