Join us

smuggling: २० कोटींचे कोकेन, दोन दारूच्या बाटलीत, आफ्रिकेतून तस्करी; डीआरआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 7:37 AM

smuggling: फ्रिकेतील लागोस या शहरातून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाने मद्याच्या दोन बाटल्यांतून आणलेले ३ किलो ५६ ग्रॅम वजनाचे कोकेन डीआरआयने जप्त केले आहे.

मुंबई : आफ्रिकेतील लागोस या शहरातून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाने मद्याच्या दोन बाटल्यांतून आणलेले ३ किलो ५६ ग्रॅम वजनाचे कोकेन डीआरआयने जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत २० कोटी रुपये इतकी आहे. मद्याच्या बाटलीतून अमली पदार्थांच्या झालेल्या या तस्करीच्या नव्या कार्यपद्धतीमुळे अधिकारीदेखील चक्रावून गेले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लागोस येथून अदिस अबाबा मार्गे मुंबईत येणाऱ्या एका प्रवाशाकडे अमली पदार्थ असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा रचला होता. 

माहिती मिळालेल्या विमानातून उतरलेल्या एका प्रवाशांच्या संशयास्पद हालचालीनंतर अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून त्याच्या सामानाची झडती घेतली. मात्र, त्यात काही आढळून आले नाही. परंतु, या व्यक्तीकडे डबल ब्लॅक या मद्याच्या दोन बाटल्या होत्या. या बाटल्यांमध्ये द्रवरूपात कोकेन ठेवण्यात आले होते. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी बाटल्यांतील द्रव पदार्थाची तपासणी केली असता ते कोकेन असल्याचे आढळून आले. अशा पद्धतीने होणारी अमली पदार्थाची तस्करी हा वेगळा आणि नवा मार्ग असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याची तपासणी करणे अत्यंत कठीण आहे. ही नवीन कार्यपद्धती डीआरआयने गुरुवारी केलेल्या कारवाईद्वारे उजेडात आणली. या प्रकरणी संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.

संबंधित पद्धतीने होणारी अमली पदार्थाची तस्करी हा वेगळा आणि नवा मार्ग आहे. त्याची तपासणी करणे अत्यंत कठीण आहे. मात्र डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कारवाई केली.  

टॅग्स :तस्करीगुन्हेगारीमुंबई