Join us

तुटवडा दूर करण्यास २० लाख नवे वीजमीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वीजमीटरचा निर्माण झालेला तुटवडा दूर करण्यासाठी पुरवठादारांना १८ लाख सिंगलफेज तर १ लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वीजमीटरचा निर्माण झालेला तुटवडा दूर करण्यासाठी पुरवठादारांना १८ लाख सिंगलफेज तर १ लाख ७० हजार थ्रीफेज नवीन वीजमीटर पुरवठ्याच्या दिलेल्या कार्यादेशान्वये १ लाख ४४ हजार ९०४ वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध झाले असून मार्च अखेरपर्यंत ३ लाख ८० हजार वीजमीटरचा पुरवठा होणार आहे.

दरवर्षी सुमारे ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मार्च २०२० नंतर कोरोनामुळे नवीन वीज जोडणी देण्यात काही अडचणी आल्या. जून २०२० नंतर ६ लाख ५० हजार ५२३ सिंगलफेज तर ६२ हजार ५५ थ्रीफेज ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. मुबलक वीजमीटरच्या उपलब्धतेसाठी एका वर्षापेक्षा अधिक कालावधीचे नियोजन केले आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियेद्वारे सिंगल फेजचे १८ लाख आणि थ्री फेजचे १ लाख ७० हजार असे एकूण १९ लाख ७० हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्यात येत आहे.

_____________

वीजमीटर उपलब्ध

पुणे प्रादेशिक कार्यालयाकडे ३८ हजार ७०४

कोकण प्रादेशिक कार्यालयांकडे ६९ हजार ७००

नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडे २० हजार

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाकडे १६ हजार ५००

_