कोकणासाठी आणखी २० गणपती स्पेशल; मध्य रेल्वेकडून उद्यापासून आरक्षण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 08:23 AM2024-08-06T08:23:57+5:302024-08-06T08:24:29+5:30

या अतिरिक्त फेऱ्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस - रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेषच्या ८ फेऱ्यांचा समावेश आहे.

20 more Ganpati specials for Konkan; Reservation from Central Railway starts from tomorrow | कोकणासाठी आणखी २० गणपती स्पेशल; मध्य रेल्वेकडून उद्यापासून आरक्षण सुरू

कोकणासाठी आणखी २० गणपती स्पेशल; मध्य रेल्वेकडून उद्यापासून आरक्षण सुरू

मुंबई : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २०२ फेऱ्यांव्यतिरिक्त आणखी २० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे गाड्यांचे आरक्षण ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

या अतिरिक्त फेऱ्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस - रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेषच्या ८ फेऱ्यांचा समावेश आहे. ही ०१०३१ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६, ७, १३, १४ सप्टेंबर या दिवशी ८ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ४:५० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे ०१०३२ विशेष गाडी रत्नागिरी येथून ७, ८, १४, १५ सप्टेंबर या दिवशी सकाळी ८:४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी ५:१५ वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.

त्याचप्रमाणे पनवेल - रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ही ०१४४३ विशेष गाडी पनवेल येथून ८ आणि १५ सप्टेंबर रोजी ४:४० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल. तसेच ०१४४४ विशेष गाडी रत्नागिरी येथून ७ आणि १४ सप्टेंबर रोजी ५:५० वाजता सुटून आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १:३० वाजता पोहोचेल. या गाडीला पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबा देण्यात आला आहे.

पुणे - रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये ०१४४७ विशेष गाडी पुणे येथून ७ आणि १४ सप्टेंबरला ००.२५ वाजता सुटून रत्नागिरीला सकाळी ११.५० वाजता पोहोचेल. तसेच ०१४४८ विशेष गाडी रत्नागिरी येथून ८ आणि १५ सप्टेंबर रोजी ५:५० वाजता सुटून पुणे येथे दुसऱ्या दिवशी ५:०० वाजता पोहोचेल. ही ट्रेन चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.

यामध्ये पनवेल - रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्यांचा समावेश आहे. ०१४४१ विशेष गाडी ११ सप्टेंबर रोजी ४:४० वाजता पनवेल येथून सुटून रत्नागिरी येथे ११:५० वाजता पोहोचेल. तर ०१४४२ विशेष गाडी १० रोजी ५:५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १:३० वाजता पोहोचेल.

पुणे - रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्याही चालवण्यात येणार आहेत. यामध्ये ०१४४५ विशेष गाडी १० रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल.

Web Title: 20 more Ganpati specials for Konkan; Reservation from Central Railway starts from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे