मुंबई : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २०२ फेऱ्यांव्यतिरिक्त आणखी २० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे गाड्यांचे आरक्षण ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
या अतिरिक्त फेऱ्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस - रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेषच्या ८ फेऱ्यांचा समावेश आहे. ही ०१०३१ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६, ७, १३, १४ सप्टेंबर या दिवशी ८ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ४:५० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे ०१०३२ विशेष गाडी रत्नागिरी येथून ७, ८, १४, १५ सप्टेंबर या दिवशी सकाळी ८:४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी ५:१५ वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.
त्याचप्रमाणे पनवेल - रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ही ०१४४३ विशेष गाडी पनवेल येथून ८ आणि १५ सप्टेंबर रोजी ४:४० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल. तसेच ०१४४४ विशेष गाडी रत्नागिरी येथून ७ आणि १४ सप्टेंबर रोजी ५:५० वाजता सुटून आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १:३० वाजता पोहोचेल. या गाडीला पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबा देण्यात आला आहे.
पुणे - रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये ०१४४७ विशेष गाडी पुणे येथून ७ आणि १४ सप्टेंबरला ००.२५ वाजता सुटून रत्नागिरीला सकाळी ११.५० वाजता पोहोचेल. तसेच ०१४४८ विशेष गाडी रत्नागिरी येथून ८ आणि १५ सप्टेंबर रोजी ५:५० वाजता सुटून पुणे येथे दुसऱ्या दिवशी ५:०० वाजता पोहोचेल. ही ट्रेन चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.
यामध्ये पनवेल - रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्यांचा समावेश आहे. ०१४४१ विशेष गाडी ११ सप्टेंबर रोजी ४:४० वाजता पनवेल येथून सुटून रत्नागिरी येथे ११:५० वाजता पोहोचेल. तर ०१४४२ विशेष गाडी १० रोजी ५:५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १:३० वाजता पोहोचेल.
पुणे - रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्याही चालवण्यात येणार आहेत. यामध्ये ०१४४५ विशेष गाडी १० रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल.