मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारी प्रमुख तलावं तळागाळाला गेल्यामुळे पुढच्या आठवडय़ापासून पाणीकपात लागू होण्याची शक्यता आह़े पावसाने जोर धरेर्पयत राखीव साठा पुरविण्यासाठी किमान 2क् टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार असल्याचे सुत्रंकडून समजत़े
पावसाने दडी मारल्यामुळे यंदा जून महिन्यातच पाण्याची स्थिती भीषण होऊ लागली आह़े विहार, मध्य वैतरणा ही दोन तलावं कोरडी झाली आहेत़
तर उर्वरित चार तलावांमधूनही जेमतेम जुलै महिना काढणो शक्य होणार आह़े त्यामुळे शिल्लक पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर बैठकांच्या फे:या सुरु आहेत़
दोन दिवसांमध्ये तलाव क्षेत्रत पावसाने हजेरी न लावल्यास पाणीकपातीबाबत निर्णय घ्यावाच लागेल, असे संकेत पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत दिले होत़े त्यानुसार किमान 2क् टक्के पाणीकपात लागू करण्याबाबत प्रशासनाचा विचार सुरु असल्याचे, एका वरिष्ठ अधिका:याने सांगितल़े मात्र या निर्णयावर पुढच्या आठवडय़ातच अंतिम निर्णय होणार आह़े (प्रतिनिधी)