कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी २० विशेष मेल, एक्स्प्रेस धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 06:28 AM2019-01-11T06:28:09+5:302019-01-11T06:28:36+5:30
एलटीटी ते झुसीसाठी ६ विशेष मेल, एक्स्प्रेस आहेत. ०१०८७ विशेष गाडी १६, २३ आणि ३० जानेवारी रोजी एलटीटीवरून मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून ही गाडी दुसºया दिवशी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी झुसीला पोहोचेल.
मुंबई : कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे जाणाºया भाविकांसाठी मध्य रेल्वेतर्फे २० विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. कुंभमेळ्याला जाणाºया भाविकांसाठी राज्यभरातील विशेष सुविधा प्रदान करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते गोरखपूर/झुसी (प्रयागराज), पुणे-झुसी आणि नागपूर-प्रयागराज यादरम्यान २० विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत.
एलटीटी ते झुसीसाठी ६ विशेष मेल, एक्स्प्रेस आहेत. ०१०८७ विशेष गाडी १६, २३ आणि ३० जानेवारी रोजी एलटीटीवरून मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून ही गाडी दुसºया दिवशी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी झुसीला पोहोचेल. तर ०१००८ विशेष गाडी १७, २४ आणि ३१ जानेवारी रोजी झुसीवरून सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी सुटून दुसºया दिवशी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी एलटीटीला पोहोचेल. या दोन्ही गाड्या कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज या स्थानकांवर थांबतील.
एलटीटी ते गोरखपूर अशी आठवडाभर ६ विशेष मेल, एक्स्प्रेस धावणार आहेत. ०१११५ विशेष गाडी १२, १९ आणि २६ जानेवारी रोजी एलटीटीवरून मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटून गोरखपूर येथे दुसºया दिवशी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. १३, २० आणि २७ जानेवारी रोजी गोरखपूर ते एलटीटीसाठी ०१११६ ही विशेष गाडी गोरखपूरवरून दुपारी २ वाजता सुटून एलटीटीला दुसºया दिवशी मध्यरात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. या दोन्ही गाड्या कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छियोंकी जंक्शन, वाराणसी, मऊ, भटनी, देवरीया या स्थानकांवर थांबतील.
पश्चिम रेल्वेवर विशेष मेल
पश्चिम रेल्वेच्यावतीने कुंभमेळा भाविकांसाठी मुंबईहून १ विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. वांद्रे टर्मिनस ते प्रयागराज अशी ०९०८१ क्रमांकाची विशेष गाडी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी सुटणार आहे. तर प्रयागराज ते वांद्रे टर्मिनस अशी ०९०८२ क्रमांकाची विशेष गाडी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी चालविण्यात येणार आहे. या दोन्ही क्रमाकांच्या गाडीच्या दोन फेºया होणार आहे.