मुंबई : ‘कॉमन अॅडमिशन टेस्ट’(कॅट) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आल्या. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही २० विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. यंदा या २० विद्यार्थ्यांमध्ये २ मुलींचा आणि तीन अभियांत्रिकी बॅकग्राउंड नसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात मुंबईतील एका शिक्षकाचा समावेश आहे. या शिक्षकाने ‘कॅट’मध्ये चौथ्यांदा १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत.सोमवारी संकेतस्थळावर हा निकाल जाहीर झाला आहे. २०१६ मध्ये झालेल्या ‘कॅट’ परीक्षेत २० विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवले होते. हे सर्व विद्यार्थी अभियांत्रिकीचे होते तसेच मुले होती. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल www.iimcat.ac.in या संकेतस्थळावर पाहता येईल. तसेच मेसेजद्वारेही विद्यार्थ्यांना निकाल कळवण्यात आला आहे.पॅट्रिक डिसुझा हे मुंबईत शिक्षक आहेत. ते कॅटसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. ते १४ वेळा कॅटच्या परीक्षेला बसले आहेत. याआधी त्यांना ९९ पर्सेंटाइल मिळाले होते. परीक्षेचे स्वरूप समजून घेण्यासाठी ते ही परीक्षा देतात. परीक्षा दिल्याने संकल्पना स्पष्ट होत असल्याचेही डिसुझा यांचे म्हणणे आहे. २६ नोव्हेंबरला कॅटची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला १ लाख ९९ हजार ६२३ विद्यार्थी बसले होते. देशातील १४० सेंटरमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. ‘आयआयएम’ लवकरच याची यादी जाहीर करणार आहे.
२० विद्यार्थ्यांना मिळाले १०० पर्सेंटाइल; ‘कॅट’चा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 1:58 AM