दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर १८०० कोटींचे हेरॉईन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 04:13 PM2022-09-21T16:13:06+5:302022-09-21T16:17:30+5:30
मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. २० टनपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई: मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर दिल्लीपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. २० टनपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत १८०० कोटींच्या आसपास आहे.
काही दिवसापूर्वी दिल्ली पोलिसांनी अफगाणी आरोपींना ताब्यात घेतले होते, यावेळी त्यांची चौकशी केली असता त्यांनी मुंबईतील बंदरावर अजून काही कंटेनर असल्याचे सांगितले. या माहितीवरुन दिल्लीपोलिसांचे विशेष पथकाने छापा टाकला. या छाप्यात १८०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले.
गुजरातच्या किनारपट्टीवर २०० कोटींचे ड्रग्ज जप्त; ६ पाकिस्तानी नागरिकांना अटक
या महिन्यातच दिल्ली पोलिसांनी कालिंदी कुंज परिसरातून दोन अफगाणी आरोपींना ताब्यात घेतले होते.त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ग्रेटर नोएडा आणि लखनौमधून १२०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते.
जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत १७२५ कोटी रुपये आहे. या कंटेनरला दिल्ली येथे आणण्यात आले आहे.मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर जप्त केलेल्या कंटेनरमधून १८०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. या ड्रग्जचे वजन ३०० किलो आहे, याची आंतरराष्ट्रीय बाजारात आज किंमत १८०० कोटी रुपये होते. हे ड्रग्ज दुबई येथून आले असल्याची माहिती समोर आली आहे.
In one of the biggest seizures of Heroin, a container having 22 tonnes approx of Licorice coated with Heroin was seized from a container at Nava Sheva Port, Mumbai. The value of the Heroin seized is Rs 1,725 Crores in the international market: Delhi Police Special Cell pic.twitter.com/kJaLA2CDYL
— ANI (@ANI) September 21, 2022
तपासात हे ड्रग्ज चेन्नई येथे अफगाणीस्तान येथून आले असल्याची माहिती मिळाली आहे. तिथून लखनौ आणि दिल्लीत आले. यानंतर देशभरातील शहरात जाणार होते, याचा पैसा पाकिस्तानातील आयएसआय एजन्सीला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.