Join us

पुराव्या अभावी २० वर्षीय आरोपीची पोक्सो कायद्यातून निर्दोष मुक्तता

By रतींद्र नाईक | Updated: October 29, 2023 20:01 IST

प्रबळ पुराव्या अभावी आरोपीची न्यायालयाने सुटका केली आहे.

मुंबई : मित्राच्या भावाने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या २० वर्षीय आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रबळ पुराव्या अभावी आरोपीची न्यायालयाने सुटका केली आहे.

२० वर्षीय आरोपीसह १७ वर्षीय तरुणीची ओळख झाली त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व त्यानंतर प्रेमात झाले. मे २०२१ साली ती तरुणी मित्राच्या घरी गेली असता त्या ठिकाणी आरोपी एकटाच उपस्थित होता. त्यावेळी आरोपीने तिची इच्छा नसतानाही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दोन वेळा असा प्रकार घडला त्यानंतर त्या मुलीला दिवस गेले. ती आठ महिन्यांची गर्भवती असताना तिच्या वडिलांना ही बाब माहीत झाली वडिलांनी मुलाविरोधात तात्काळ पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अतिरिक्त न्यायाधीश आदिती कदम यांच्या समोर खटला सुरू असताना आरोपीविरोधात प्रबळ पुरावे पोलिसांना सादर करता न आल्याने न्यायालयाने पोक्सो कायद्यातून निर्दोष सुटका केली.

टॅग्स :न्यायालयमुंबई