२०० कोटींच्या खंडणीची मुकेश अंबानींना धमकी, आराेपीविराेधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 06:15 AM2023-10-29T06:15:44+5:302023-10-29T06:16:20+5:30

आधी २० कोटी रुपये द्या अन्यथा आमच्याकडे शार्प शूटर तयार आहेत, अशा आशयाचा धमकीचा ई-मेल त्यांना आला होता.

200 crore extortion threat to Businessman Mukesh Ambani, case filed against ARP | २०० कोटींच्या खंडणीची मुकेश अंबानींना धमकी, आराेपीविराेधात गुन्हा दाखल

२०० कोटींच्या खंडणीची मुकेश अंबानींना धमकी, आराेपीविराेधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. २०० कोटी द्या, अन्यथा मृत्यू वॉरंटवर स्वाक्षरी केलेली आहे, असा मजकूर असलेला ई- मेल कंपनीच्या एका ई-मेल आयडीवर शुक्रवारी मिळाला. त्याआधी २० कोटी रुपये द्या अन्यथा आमच्याकडे शार्प शूटर तयार आहेत, अशा आशयाचा धमकीचा ई-मेल त्यांना आला होता. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी शादाब खान या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपण माझ्या पहिल्या ई-मेलला प्रतिसाद दिला नाही. आता रक्कम २० कोटी नाही तर, २०० कोटी आहे, असा दुसरा ई-मेल आला. ऑक्टोबर २०२२ मध्ये बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील एका ३० वर्षीय व्यक्तीला अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

आराेपीविराेधात गुन्हा दाखल

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या एका ई-मेल आयडीवर शुक्रवारी रात्री ८:५१ वाजता पहिला ई-मेल पाठवण्यात आला होता. 
  • अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया येथील सुरक्षा प्रमुखांना २७ ऑक्टोबरला मुकेश अंबानी यांच्या कार्यकारी सहायकाने धमकीच्या ई-मेलची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी गावदेवी पोलिसांत तक्रार दाखल केली. 
  • पोलिसांनी अंबानींना आलेल्या ई-मेल आयडीच्या तपशिलांची छाननी करत तो पाठवणाऱ्याची ओळख शादाब खान अशी केल्याचे समजते. संशयित शादाबच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 200 crore extortion threat to Businessman Mukesh Ambani, case filed against ARP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.