ठगांकड़ून २०० बनावट पासपोर्ट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:07 AM2021-01-15T04:07:24+5:302021-01-15T04:07:24+5:30

सहा जणांना अटक : परदेशातील नोकरीच्या आमिषाने फसवणूक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या ...

200 fake passports seized from thugs | ठगांकड़ून २०० बनावट पासपोर्ट जप्त

ठगांकड़ून २०० बनावट पासपोर्ट जप्त

Next

सहा जणांना अटक : परदेशातील नोकरीच्या आमिषाने फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या सहा जणांना मालाडमधून अटक करण्यात आली. या टोळीकडून पाेलिसांनी २०० बनावट पासपोर्ट जप्त केले.

अब्दुल हसीम शेख (३३), शेख मैनुदीन शेख मुसुरुद्दीन (४४), सफोरीद शेख मुसुरुद्दीन (३४), मोइनुद्दीन गोडदार (३४), जयंतकुमार मंडल (३८), तारक मोंडल (३२) अशी अटक आरोपींची नावे असून ते पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत.

मालाड येथील मॉलमध्ये मुंबई श्री कन्सल्टन्सी या नावाने सुरू असलेल्या कार्यालयाद्वारे परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याची माहिती कक्ष ८ चे सहायक पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांना मिळाली हाेती. त्यानुसार पथकाने नुकताच तेथे छापा टाकला. ही टोळी सावज जाळ्यात अडकताच त्याच्याकडून ८० हजार ते १ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे ४१ भारतीय पारपत्रे तसेच परदेशातील कंपनीचे बनावट नोकरी करार प्रमाणपत्र, व्हिसा सापडले.

आतापर्यंत २०० बनावट पारपत्र पाेलिसांच्या हाती लागली असून त्यांच्याकडील बँक खात्याचा लेखाजोखा काढण्यात येत आहे. या टाेळीने आतापर्यंत शेकडो जणांची फसवणूक केली असून पाेलीस अधिक तपास करीत आहेत.

................................................

Web Title: 200 fake passports seized from thugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.