मुंबई ते मॉरिशस विमानात पाच तास २०० प्रवासी अडकले, वृद्धाला झाला श्वसनाचा त्रास

By मनोज गडनीस | Published: February 24, 2024 05:17 PM2024-02-24T17:17:09+5:302024-02-24T17:17:35+5:30

मॉरिशसला जाणाऱ्या २०० प्रवाशांना शनिवारी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

200 passengers stuck in Mumbai-Mauritius flight for five hours, old man suffers from breathing problem | मुंबई ते मॉरिशस विमानात पाच तास २०० प्रवासी अडकले, वृद्धाला झाला श्वसनाचा त्रास

मुंबई ते मॉरिशस विमानात पाच तास २०० प्रवासी अडकले, वृद्धाला झाला श्वसनाचा त्रास

मुंबई - एअर मॉरिशस कंपनीचे मुंबईतून मॉरिशसला जाणारे विमान तांत्रिक दोषामुळे तब्बल पाच तास रखडल्याने व नंतर रद्द झाल्यामुळे मॉरिशसला जाणाऱ्या २०० प्रवाशांना शनिवारी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या पाच तासांमध्ये हे सर्व प्रवासी विमानातच बसून होते. त्या दरम्यान विमानातील वातानुकुलित यंत्रणा देखील व्यवस्थित नसल्यामुळे एका ७८ वर्षीय वृद्धाला श्वसनाचा त्रास झाल्याचा दावा त्या विमानातील एका प्रवाशाने केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुंबईवरून मॉरिशसला जाण्यासाठी एअर मॉरिशसच्या विमानाने शनिवारी पहाटे पावणे चार वाजता प्रवाशांना विमानात बसण्यासाठी सोडले. विमानाच्या उड्डाणाची वेळ पहाटे ४.३० होती. सर्व प्रवासी विमानात आसनस्थ झाले आणि विमानाच्या उड्डाणाची वेळ टळून गेली तर विमानाने उड्डाण केले नाही. जवळपास तासाभराने विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे उड्डाण होऊ शकत नसल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली.

Web Title: 200 passengers stuck in Mumbai-Mauritius flight for five hours, old man suffers from breathing problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.