जमीर काझी
मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपनी, उद्योगधंदे चालवून हजारो कोटींची उलाढाल करणाऱ्या दोन हजारजणांनी मुंबई महापालिकेच्या हक्काचा मालमत्ता कर भरलेला नाही. त्यांनी तब्बल दोन हजार २९४.९५ कोटींचा कर थकविला आहे. त्यांच्याकडील वसुलीसाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.
२०० थकबाकीदारांकडे एकूण २,२९४.९५ कोटी अडकले आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा डिफॉल्टर एमएमआरडीएचे द चीफ ट्रान्सपोर्ट ॲण्ड कम्युनिकेशन ही आहे. त्यांच्याकडे- ११०.५ इतकी थकबाकी आहे, तर २००व्या क्रमांकावर मेसर्स पर्णकुटी एसआरए सीएचएस लिमिटेड ही आहे. त्यांनी ३.३० कोटी देणे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय - मोठे थकबाकीदार असलेल्या २०० जणांची मुंबई महानगरपालिकेने यादी बनवली आहे. गेल्या दहा वर्षांपासून कर न भरणाऱ्या ‘टॉप २००’ जणांत बिल्डर, मल्टिनॅशनल व कार्पोरेट कंपन्यांचा समावेश आहे. - त्यातील अनेकांनी राज्य सरकार, एमएमआरडीए व पालिकेचे हजारो कोटींची कंत्राटे घेतली आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
विशेष म्हणजे या २०० जणांच्या थकबाकीबद्दल संबंधितांनी पालिकेकडे कसलीही हरकत घेतलेली नाही, तसेच न्यायालयीन वाद, स्थगिती वगैरे काहीही नाही.
टॉप टेन डिफॉल्टर; थकबाकीदार व त्याच्याकडील थकीत कर (कोटीत) -- एमएमआरडीएचे द चीफ ट्रान्सपोर्ट ॲण्ड कम्युनिकेशन : ११०.५- एल ॲण्ड टी स्कॉमी इंजि.बी.एच. डी.कॉन्सोरटीम : ८२.१३- मेसेर्स.सुमेर असोसिएटस : ७२.५३- मेसेर्स श्रीनिवास कॉटन मिल्स लिमिटेड : ६९.२८- जवाला रिअल इस्टेट प्रा. लिमिटेड : ५४.१४- एचसीसी-एमएमएस जॉइंट व्हेंचर : ५३.७४- द मॅनेजर नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया वल्लभभाई पटेल स्टेडियम : ५२.५२- असिस्टंट मॅनेजर फायनान्स (लीलावती हॉस्पिटल) : ५१.४७- वाधवा ॲण्ड डीझर्व्ह बिल्डर एलएल पी : ५०.४१- मेसेर्स सीईसी-आयटीडी सीईएम-टीपीएल जेव्ही : ४९.७२
: देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपनी, उद्योगधंदे चालवून हजारो कोटींची उलाढाल करणाऱ्या दोन हजारजणांनी मुंबई महापालिकेच्या हक्काचा मालमत्ता कर भरलेला नाही. त्यांनी तब्बल दोन हजार २९४.९५ कोटींचा कर थकविला आहे. त्यांच्याकडील वसुलीसाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.
२०० थकबाकीदारांकडे एकूण २,२९४.९५ कोटी अडकले आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा डिफॉल्टर एमएमआरडीएचे द चीफ ट्रान्सपोर्ट ॲण्ड कम्युनिकेशन ही आहे. त्यांच्याकडे- ११०.५ इतकी थकबाकी आहे, तर २००व्या क्रमांकावर मेसर्स पर्णकुटी एसआरए सीएचएस लिमिटेड ही आहे. त्यांनी ३.३० कोटी देणे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय - मोठे थकबाकीदार असलेल्या २०० जणांची मुंबई महानगरपालिकेने यादी बनवली आहे. गेल्या दहा वर्षांपासून कर न भरणाऱ्या ‘टॉप २००’ जणांत बिल्डर, मल्टिनॅशनल व कार्पोरेट कंपन्यांचा समावेश आहे. - त्यातील अनेकांनी राज्य सरकार, एमएमआरडीए व पालिकेचे हजारो कोटींची कंत्राटे घेतली आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
विशेष म्हणजे या २०० जणांच्या थकबाकीबद्दल संबंधितांनी पालिकेकडे कसलीही हरकत घेतलेली नाही, तसेच न्यायालयीन वाद, स्थगिती वगैरे काहीही नाही.
टॉप टेन डिफॉल्टर - थकबाकीदार व त्याच्याकडील थकीत कर (कोटीत) -- एमएमआरडीएचे द चीफ ट्रान्सपोर्ट ॲण्ड कम्युनिकेशन : ११०.५- एल ॲण्ड टी स्कॉमी इंजि.बी.एच. डी.कॉन्सोरटीम : ८२.१३- मेसेर्स.सुमेर असोसिएटस : ७२.५३- मेसेर्स श्रीनिवास कॉटन मिल्स लिमिटेड : ६९.२८- जवाला रिअल इस्टेट प्रा. लिमिटेड : ५४.१४- एचसीसी-एमएमएस जॉइंट व्हेंचर : ५३.७४- द मॅनेजर नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया वल्लभभाई पटेल स्टेडियम : ५२.५२- असिस्टंट मॅनेजर फायनान्स (लीलावती हॉस्पिटल) : ५१.४७- वाधवा ॲण्ड डीझर्व्ह बिल्डर एलएल पी : ५०.४१- मेसेर्स सीईसी-आयटीडी सीईएम-टीपीएल जेव्ही : ४९.७२