मुंबई : राज्यातील हातमाग विणकर कुटुंबांना प्रति महिना २०० युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यात नोंदणीकृत असलेल्या ३,५०० हातमाग कुटुंबधारकांना मिळणार आहे. राज्यात नोंदणी न झालेल्या हातमाग विणकर कुटुंबांची संख्या २५ हजारांच्या घरात आहे. राज्यात नाशिकमधील येवला, सोलापूर शहर, पैठण या ठिकाणी हातमाग कुटुंबांची संख्या जास्त आहे. ‘एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८’ जाहीर केले आहे.
लाभासाठी अटी काय?
विणकर हा केंद्राच्या सर्वात अलीकडील हातमाग अंतर्गत नोंदणीकृत विणकर असावा. त्याच्याकडे त्याबाबतचे ओळखपत्र असावे. एकाच कुुटुंबात जास्त लाभार्थी असतील तर फक्त एकच लाभार्थी अर्ज करू शकेल. अर्जाच्या दिनांकापूर्वी सहा महिन्यांपासून विणकर या व्यवसायात कार्यरत असावा. पुरावा म्हणून कच्चा माल खरेदी व पक्का माल विक्रीची देयके, महामंडळ, महासंघ अथवा संस्थेचा सभासद असल्यासमजुरी दिल्याबाबत संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र सादर करावा