आगरदांडा : खार अंबोली ग्रामपंचायत हद्दीतील रोहा-भालगाव रस्त्यावर दोनशे वर्षापूर्वीचे महाकाय वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. जुन्या जाणत्या बुजुर्ग लोकांनी सांगितले की, हा वृक्ष खूप जुना असून या वृक्षाने आमच्या दोन तीन पिढ्या पाहिल्याचे सांगतात.वडाचे झाड जुने असल्याने व खूप महाकाय असल्याने त्याला तोडण्यासाठी खूप कष्ट पडत आहेत हे झाड अगदी रस्त्याच्या मधोमध पडल्याने मुरुड भालगाव मार्गे रोहा ही रहदारी पूर्णत: बंद झाली होती. बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता यांच्या सहकार्याने आता सर्व गाड्या राजपुरी खोकरी मार्गे जात आहेत.मुरुड तालुक्यात सध्या जोरदार पाऊस असून वृक्ष कोलमडून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता विजय पोतदार व दिलीप मदने व कोळी तात्या व पाटील खाणवले सुधाकर पाटील हे या महाकाय वृक्षाला काढण्यासाठी जेसीबीचा वापर करून अथक प्रयत्न क रत आहेत. (वार्ताहर)
२०० वर्षांचे वडाचे झाड कोसळले
By admin | Published: July 18, 2014 12:50 AM