राज्यात २ हजार किमीचे नवे रस्ते; विदर्भ, मराठवाड्याला होणार मोठा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:34 PM2018-01-20T23:34:58+5:302018-01-20T23:35:07+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी राज्यातील महामार्ग बांधणी/विस्ताराचा आढावा घेताना एक वर्षात दोन हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याची ग्वाही दिली. त्याचा मोठा फायदा विदर्भ आणि मराठवाड्याला होणार आहे. या कामांसाठीचे भूसंपादन मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 

2,000 km new roads in the state; Big advantage to Vidarbha, Marathwada | राज्यात २ हजार किमीचे नवे रस्ते; विदर्भ, मराठवाड्याला होणार मोठा फायदा

राज्यात २ हजार किमीचे नवे रस्ते; विदर्भ, मराठवाड्याला होणार मोठा फायदा

Next

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी राज्यातील महामार्ग बांधणी/विस्ताराचा आढावा घेताना एक वर्षात दोन हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याची ग्वाही दिली. त्याचा मोठा फायदा विदर्भ आणि मराठवाड्याला होणार आहे. या कामांसाठीचे भूसंपादन मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 
केंद्र शासनाच्या भारतमाला या राज्यातील रस्ते विकासाच्या योजनेचा सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेण्यात आला. बैठकीला फडणवीस, गडकरी, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
केंद्रातर्फे राज्यात मार्चअखेरपर्यंत दीड ते पावणेदोन लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे प्रस्तावित असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, रस्ते विकासासाठी लागणाºया वन विभागाच्या परवानगीबाबत सचिव वने यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयासोबत बैठक घ्यावी. मार्चपर्यंत जिल्हाधिकाºयांनी जमीन अधिग्रहीत करून दिल्यास पावसाळ्यापूर्वी काम सुरू करता येईल. वन विभागाच्या परवानग्या, भूसंपादनातील अडचणी याबाबत बैठकीत चर्चा झाली. 

पालखी मार्गाच्या कामांना मिळणार गती
- संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामांना गती देण्याचे निर्देश फडणवीस आणि गडकरी यांनी दिले. संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील कामांमध्ये बारामती-इंदापूर, पाटस-वसुंदे फाटा-बारामती, इंदापूर-अकलुज-मलखांबी-बोंडाळे या मार्गाचा समावेश आहे. 
च्संत ज्ञानेश्वर पालखी मार्गात मोहोळ ते पंढरपूर बायपासचा शेवट, पंढरपूर बायपास वाखरी ते खुडूस, खुडूस-धर्मापुरी, सोलापूर, सातारा जिल्हा सीमा, लोणंद-निरा बायपास, लोणंद-पिंपरे, जेजुरी बायपास ते हडपसर या कामांचा समावेश आहे. 

Web Title: 2,000 km new roads in the state; Big advantage to Vidarbha, Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.