आरे वाचवा, जंगल वाचवा; सलग दुसऱ्या रविवारी वृक्षतोडीविरोधात मानवी साखळी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 05:42 PM2019-09-08T17:42:43+5:302019-09-08T17:44:51+5:30

मानवी साखळीत 2 हजार लोकांचा सहभाग

2000 Mumbaikers Form A Human Chain To Stop The BMC From Cutting Trees In Aarey Colony | आरे वाचवा, जंगल वाचवा; सलग दुसऱ्या रविवारी वृक्षतोडीविरोधात मानवी साखळी

आरे वाचवा, जंगल वाचवा; सलग दुसऱ्या रविवारी वृक्षतोडीविरोधात मानवी साखळी

Next

मुंबई: आरे वाचवा, जंगल वाचवा नारा देत भर पावसात आज सकाळी 11 ते दुपारी 1.30 पर्यंत आरेत 2000 नागरिक व पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी करून वृक्षतोडीला जोरदार विरोध केला. आजच्या मानवी साखळी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस व आपचे सदस्य आपल्या पक्षाचे झेंडे व चिन्हे घेऊन उपस्थित होते. काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांही नागरिक म्हणून या निषेधात भाग घेतला.

मेट्रो 3 कार शेडच्या उभारणीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीने गोरेगाव (पूर्व) आरेतील 2328 झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. याविरोधात तरुणाईसह अनेक पर्यावरणवादी संस्था एकवटल्या आहेत. आज सकाळी 11 वाजता आरे वनविभागातील आदिवासी व विविध पर्यावरण संस्थांचे कार्यकर्ते, महाविद्यालयांचे विद्यार्थी व नागरिक यांनी भर पावसात आरे पिकनिक पॉईंटजवळ सकाळी 11 वाजता एकत्र जमले होते. त्यांनी मोठी मानवी साखळी करून वृक्ष तोडीला जोरदार विरोध दर्शवला. तर बायकर्स ग्रुपनेदेखील आपल्या दुचाकींवर स्वार होऊन मेट्रो कार शेडला जोरदार विरोध केला.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि इतर अनेक ठिकाणांहून आलेल्या नागरिकांनी आजच्या मानवी साखळीत मुलांसह, मित्रांसह सहभाग घेतला. मानवी साखळी गोरेगाव पूर्व, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने कारशेड क्षेत्राच्या उलट बाजूपर्यंत वाढवण्यात आली होती. गेल्या रविवारदेखील भर पावसात सुमारे 2000 नागरिकांनी येथील मेट्रो कार शेड विरोधात मानवी साखळी केली होती. त्यात सुशांत बाली, निशांत बंगेरा, राधिका झवेरी यांच्यासह आरे कॅनझर्व्हेशन ग्रुप, म्यूज आणि अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आजच्या साखळीतदेखील सहभाग नोंदवला. 

राष्ट्रवादी काँगेसच्या जेष्ठ नेत्या व खासदार सुप्रिया सुळे या आजच्या कार्यक्रमाला हजर होत्या. आंदोलकांनी त्यांना हा विषय तपशीलवार समजावून सांगितला. आरे येथे मुंबईकरांना प्रकल्प नको आणि मेट्रो 3 कारशेडप्रमाणे इतर सर्व प्रकल्प (प्राणिसंग्रहालय, आरटीओ, मेट्रो भवन माधा इ.) आरे येथून नैसर्गिक भाग नसलेल्या इतर ठिकाणी हलवावेत, असे नागरिकांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: 2000 Mumbaikers Form A Human Chain To Stop The BMC From Cutting Trees In Aarey Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.