Join us

२०००च्या नोटांची साठवणूक; काळ्या पैशांना पुन्हा फुटले पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 2:23 AM

२०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या दुसºया अर्धवर्षात एटीएममधून रोख ‘विथड्रॉल’ १२.२ टक्क्यांनी वाढल्याचे मत या आर्थिक संशोधन विभागाने मांडले होते.

चिन्मय काळे ।मुंबई : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा उपाय करून एक हजारच्या नोटा बंद केल्या. पण त्याबदल्यात चलनात आलेल्या २ हजारच्याच नोटा साठवून तिजोऱ्या भरण्याचे प्रमाण वाढल्याचा अहवाल सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेने दिला आहे. नोटाटंचाईमागे नोटा साठवणूक असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. काळा पैसा पुन्हा वाढत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.२०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या दुसºया अर्धवर्षात एटीएममधून रोख ‘विथड्रॉल’ १२.२ टक्क्यांनी वाढल्याचे मत या आर्थिक संशोधन विभागाने मांडले होते.नोटा छपाई करावी लागेलचालू आर्थिक वर्षाच्या या पहिल्याच महिन्यात बाजारात असामान्य हालचाली दिसून येत असून तेच टंचाईचे मुख्य कारण आहे. आता देशात २००० रुपयांच्या नोटांचा साठा होतो आहे.या २००० रुपयांच्या नोटा बाजारात परत न आल्यास नोटाटंचाई दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला नवीन नोटांची छपाई करण्याखेरीज गत्यंतर नाही, असे स्पष्ट मत स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष यांनी व्यक्त केले आहे.आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत रिझर्व्ह बँकेकडून सरासरी ४.५ ते ५ टक्के अधिक चलन बाजारात आणले जाते. २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत मात्र तब्बल ८ टक्के अधिक चलन बाजारात आणले गेले. २०१८-१९च्या पहिल्या १५ दिवसांतच तिप्पट अधिक चलन बाजारात आणले गेले.

टॅग्स :निश्चलनीकरण