एसटीच्या ताफ्यात येणार २००० गाड्या; निविदा प्रक्रिया लवकरच

By नितीन जगताप | Published: September 18, 2022 07:24 AM2022-09-18T07:24:58+5:302022-09-18T07:26:06+5:30

निविदा प्रक्रिया लवकरच होणार सुरू

2000 trains to come in ST fleet; Tender process soon | एसटीच्या ताफ्यात येणार २००० गाड्या; निविदा प्रक्रिया लवकरच

एसटीच्या ताफ्यात येणार २००० गाड्या; निविदा प्रक्रिया लवकरच

Next

नितीन जगताप

मुंबई  :  शहरापासून खेड्यापाड्यापर्यंत असलेल्या सर्वसाधारण प्रवाशांची आणि एसटी बस वाहतुकीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी एसटी महामंडळाने आपली कंबर कसली आहे. ७०० साध्या गाड्या लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल हाेणार आहेत. या सोबतच दोन हजार गाड्या एसटीच्या ताफ्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया  सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाचे  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. 

एसटी महामंडळाच्या ताफ्यात १५ हजार ८७७ हजार गाड्या असून त्यापैकी १२ हजार ८२८ साध्या बस आहेत. याशिवाय ४२१ हिरकणी, २१७ विना वातानुकूलित तर उर्वरित वातानुकूलित बस, मिडी, मिनी बस आहेत. येत्या काही महिन्यांत साध्या बसची ही संख्या वाढणार आहे.  एसटीमध्ये दोन हजार जुन्या गाड्यांची पुनर्बांधणी करण्यात आली. आता ७०० बसची ऑर्डर देण्यात आली आहे.  त्या लवकरच एसटीच्या ताफ्यात येणार आहे. आणखी दोन हजार साध्या गाड्या वाढविण्याचे एसटीचे नियोजन असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.   एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १६ हजार बस आहेत. त्यापूर्वी एसटीच्या ताफ्यात १८ हजार बसगाड्या होत्या. गेल्या तीन वर्षांत नवीन बसगाड्या खरेदी करण्यात आल्या नाहीत. मात्र, आयुर्मान संपुष्टात आलेल्या गाड्या भंगारात काढण्यात येत असल्याने ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी बस अभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महामंडळाने बसगाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. 

आता ७०० बसची ऑर्डर देण्यात आली आहे. त्या लवकरच एसटीच्या ताफ्यात येणार आहे. डिझेलवरील आणखी  दोन हजार गाड्या घेण्याचे नियोजन आहे. त्याच्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. 
- शेखर चन्ने,
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Web Title: 2000 trains to come in ST fleet; Tender process soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.