मालमत्ता कराची २० हजार कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:07 AM2021-01-15T04:07:13+5:302021-01-15T04:07:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराचे २० हजार कोटी रुपये थकीत आहेत, तर सन ...

20,000 crore property tax arrears | मालमत्ता कराची २० हजार कोटींची थकबाकी

मालमत्ता कराची २० हजार कोटींची थकबाकी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराचे २० हजार कोटी रुपये थकीत आहेत, तर सन २०२० -२०२१ आर्थिक वर्षात पाच हजार ३०० कोटींपैकी केवळ ९५० कोटी आतापर्यंत जमा झाले आहेत. त्यामुळे ५० मोठ्या थकबाकीदारांची यादी महापालिकेने तयार केली आहे. या थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत थकीत रक्कम न भरल्यास त्यांच्या मालमत्तेचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे.

जकात कर रद्द झाल्यानंतर मालमत्ता आणि विकास कराच्या माध्यमातूनच महापालिकेचा डोलारा उभा आहे. मात्र, ५०० चौरस फुटांच्या मालमत्तांना सवलत आणि गेल्यावर्षी कोविड काळात मालमत्ता कर वसुली लांबणीवर पडली. त्यामुळे ३१ मार्च २०२१ पर्यंत ४३०० कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. विकासक, हॉटेल मालक, व्यापारी संकुल अशा काही मोठ्या थकबाकीदारांनी २०१० पासून मालमत्ता कर थकविला आहे. ३१ मार्चपर्यंत त्यांनी थकबाकी न भरल्यास त्यांच्यावर दोन टक्के दंड दरमहा आकारण्यात येणार आहे.

एखाद्या मालमत्तेचा कर थकीत असल्यास त्यांना नोटीस पाठवून ९० दिवसांची मुदत देण्यात येते. दिलेल्या मुदतीत थकीत रक्कम न भरल्यास संबंधित मालमत्तेचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येतो. त्यानंतरही कोणती दखल न घेतल्यास त्या मालमत्तेवर जप्ती आणून २१ दिवसांच्या कालावधीत लिलाव करण्यात येतो. २०१९ मध्ये महापालिकेने अशा काही मालमत्तांवर जप्ती आणून त्यांचा लिलाव करण्याची तयारी केली होती. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर कोरोना काळात सर्व कामे लांबणीवर पडली. आता लवकरच लिलावाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

* उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेला जकात कर रद्द झाल्यानंतर २०१७ पासून महापालिकेच्या उत्पन्नात घट होऊ लागली. डिसेंबर २०२० पर्यंत १९ हजार ९५० मलामत्ता कर थकला आहे.

* सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ६७८८ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, यात आता सुधारणा करीत ५३०० कोटी लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Web Title: 20,000 crore property tax arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.