मुंबई- मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खानला दिलासा दिला आहे. शनिवारी (ता. 21मार्च) मुंबई सत्र न्यायालयाने 2002 च्या हिट अॅण्ड रन प्रकरणातील सलमानच्या विरोधाताली जामीनपात्र वॉरन्ट रद्द केला आहे. 2002 च्या हिट अॅण्ड रन प्रकरणात सलमानविरोधात जामीनपात्र वॉरन्ट जारी करण्यात आला होता तो वॉरन्ट रद्द करण्यात आला आहे. नुकतंच जोधपूरमधील काळविट शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूर सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण त्यानंतर सलमानला जामीन मिळाला.
हिट अॅण्ड रन प्रकरण 2002मधील आहे. दारू पिऊन गाडी चालवत असतान सलमानने एका व्यक्तीला गाडीने उडवलं होतं. त्या अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाला, असा आरोप सलमान खानवर आहे. या अपघातात चार जण जखमीही झाले होते. याप्रकरणात पुराव्यांच्या अभावी हायकोर्टाने सलमानला निर्दोषही सोडलं होतं. पण त्यानंतर महाराष्ट्र सरकारने हायकोर्टाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
हायकोर्टाने न्याय केला नाही. अपघात झाला तेव्हा सलमान गाडी चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी व जखमींनी दिली, असं असतानाही सलमानला सोडण्यात आलं. इतकंच नाही, तर घटनेच्या वेळी सलमानच्या गाडीत असणाऱ्या बॉडीगार्डनेही सलमान गाडी चालवत असल्याचं सांगितलं होतं, असं महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात अपील करताना म्हटलं होतं.