Join us

२०२० : भय इथले संपत नाही; ७३ हजार ६५५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 4:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात काही ना काही घटना घडत असतात. अशा घटना, व्याधी, वृद्धापकाळ, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात काही ना काही घटना घडत असतात. अशा घटना, व्याधी, वृद्धापकाळ, आजारपण अशा कारणाने मृत्यूचा आकडाही वाढत असतो. २०२० हे वर्ष तर कोरोना घेऊन आलेले वर्ष असून, कोरोनामुळे मृत्यू होत असतानाच विविध कारणांमुळेही मृत्यू होता असतात. या मृत्यूचे प्रमाण पाहता २०२०मध्ये ऑगस्ट अखेर मुंबईत मृत्यू ७३ हजार ६५५ झाले आहेत.

मुंबईतल्या विविध विषयांवर काम करत असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांना माहिती अधिकाराखाली कागदपत्रांतून ही माहिती प्राप्त झाली आहे. २०२० सालात ऑगस्ट अखेर माहिती मिळाली आहे. तर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची माहिती त्यांना प्राप्त झालेली नाही. दुसरीकडे २०१४ सालापासून आकडेवारी पाहता परळ, एल्फिन्स्टन येथे मुंबईत सर्वाधिक मृत्यू झाले असून, हा आकाडा ७ हजार २०३ आहे. तर सर्वात कमी मृत्यू मोहम्मद अली रोड, डोंगरी येथे झाले असून, हा आकडा १ हजार १९ आहे. २०१४ नंतरच्या सालातही परळ आणि एल्फिन्स्टन परिसरात मुंबईत सर्वाधिक मृत्यू झाले असून, सर्वात कमी मृत्यू चिराबाजार, काळबादेवी आणि भुलेश्वर येथे झाले आहेत. भायखळा, आग्रीपाडा आणि नागपाडा येथेही सर्वाधिक मृत्यू झाले असून, सर्वात कमी मृत्यू मोहम्मद अली रोड, डोंगरी येथे नोंदवले गेले आहेत.

-------------------

२०१५मध्ये भायखळा, आग्रीपाडा आणि नागपाडा येथे सर्वाधिक मृत्यू झाले. हा आकडा ७ हजार ४२९ आहे. तर सर्वात कमी मृत्यू मोहम्मद अली रोड, डोंगरी येथे झाले. हा आकडा ९३० आहे. २०१६मध्ये भायखळा, आग्रीपाडा आणि नागपाडा परिसरात सर्वाधिक मृत्यू झाले. हा आकडा ९ हजार ८९० आहे. सर्वात कमी मृत्यू मोहम्मद अली रोड, डोंगरी येथे झाले. हा आकडा ६७६ आहे.

-------------------

२०१७मध्ये परळ आणि एल्फिन्स्टन परिसरात सर्वाधिक मृत्यू झाले. हा आकडा ११ हजार १४८ आहे. सर्वात कमी मृत्यू चिराबाजार, काळबादेवी आणि भुलेश्वर येथे झाले. हा आकडा ६४६ आहे. २०१८मध्ये परळ आणि एल्फिन्स्टन परिसरात सर्वाधिक मृत्यू झाले. हा आकडा ११ हजार २८ आहे. सर्वात कमी मृत्यू चिराबाजार, काळबादेवी आणि भुलेश्वर येथे झाले. हा आकडा ६९४ आहे.

-------------------

कोणत्या वर्षी, किती मृत्यू.

२०११ : ९१ हजार ६८८

२०१२ : ८८ हजार ४९३

२०१३ : ८९ हजार ४९३

२०१४ : ९३ हजार २५४

२०१५ : ९४ हजार ७०६

२०१६ : ८६ हजार ६४२

२०१७ : ८९ हजार ०३७

२०१८ : ८८ हजार ८५२

२०१९ : ९१ हजार २२३

२०२० : ७३ हजार ६५५ (ऑगस्ट अखेर)

-----------------------------

मृत्यूची नोंद वर्ष आणि महिनानिहाय...

महिना-२०१७-२०१८-२०१९-२०२०

मे-६९६०-७४०७-७३३५-९१६१

जून-७०६८-६८७४-६७३२-१५७५६

जुलै-७६७५-७३३६-७९३१-११७७०

ऑगस्ट-७२४७-७३७२-८१६४-१०२१५

-----------------------------

कोणत्या वर्षी, किती मृत्यू. (मृत्युदर)

२०११ : ७.३७

२०१२ : ७.०८

२०१३ : ७.१३

२०१४ : ७.१४

२०१५ : ७.४९

२०१६ : ६.८३

२०१७ : ६.९९

२०१८ : ६.९५

-----------------------------