२0४ अनधिकृत खासगी शाळा

By admin | Published: December 9, 2015 01:03 AM2015-12-09T01:03:03+5:302015-12-09T01:03:03+5:30

मुंबईत २०४ अनधिकृत खासगी शाळा असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. पालिकेच्या एम पश्चिम वॉर्डमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३६ अनधिकृत शाळा असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

204 unauthorized private schools | २0४ अनधिकृत खासगी शाळा

२0४ अनधिकृत खासगी शाळा

Next

मुंबई : मुंबईत २०४ अनधिकृत खासगी शाळा असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. पालिकेच्या एम पश्चिम वॉर्डमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३६ अनधिकृत शाळा असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे. ते म्हणाले, ‘खाजगी प्राथमिक शाळा विभागाचे उपशिक्षणाधिकारी प्रकाश चऱ्हाटे यांनी अनधिकृत खासगी शाळेची यादी दिली आहे. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार अनधिकृत खासगी शाळांना बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९मधील कलम १८(५)नुसार १ लाख रुपये दंड ठोठावण्याची तरतूद आहे. सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास रोज १० हजार रुपये दंड ठोठवण्याचीही तरतूद आहे. त्यानुसार पालिकेने शाळांना नोटिसा दिल्या आहेत.’
अनधिकृत खासगी शाळेवर केलेल्या कारवाईनंतर वसूल केलेल्या दंडाची रक्कम कोणत्या हेडखाली भरावी, याबाबत ‘बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ कायद्यात सूचना नाहीत.
द्रव्यदंडाची रक्कम कोणत्या प्राधिकरणाकडे व कोणत्या बजेट हेडखाली जमा करावी, याबाबत तरतूद नसल्यामुळे या प्रकरणी शासनास पत्रव्यवहार केला असता अद्यापपर्यंत निर्देश मिळालेले नाहीत.
शासन निर्णय अस्पष्ट असल्यामुळे २ कोटींहून अधिक दंड वसूल झालेला नाही. ही बाब खटकणारी असून, अस्पष्ट आणि अर्धवट शासन निर्णय काढणाऱ्या अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (प्र्रतिनिधी)

Web Title: 204 unauthorized private schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.