'21 अनोळखी एकाच वाहनातून परवानगीशिवाय जाऊ शकतात, मग 4 ओळखीचे का नाही?'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 06:01 PM2020-08-20T18:01:35+5:302020-08-20T18:02:34+5:30

राज्यात एसटी महामंडळातील गाड्यांना आंतरजिल्हा प्रवासासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे या प्रवासासाठी कुठलल्याही पासची किंवा परवानगीची गरज असणार नाही.

'21 strangers can go in Bus without permission, then why not 4 strangers in private vechile? ', shaumika mahadik ask | '21 अनोळखी एकाच वाहनातून परवानगीशिवाय जाऊ शकतात, मग 4 ओळखीचे का नाही?'

'21 अनोळखी एकाच वाहनातून परवानगीशिवाय जाऊ शकतात, मग 4 ओळखीचे का नाही?'

Next

मुंबई - कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर गत चार महिन्यांपासून ठप्प असलेली राज्य परिवहन महामंडळाची (एसटी)आंतरजिल्हा बससेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवाणगी दिली असून, याअनुषंगाने आज गाड्या सोडण्यात आल्य. कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून राज्यातीत जिल्हाबाहेर प्रवासासाठी लालपरी जवळपास 5 महिन्यानंतर धावताना दिसली. मात्र, लालपरीला परवानगी दिल्यानंतर खासगी वाहनातून परवानगी का नाही, असा प्रश्न सरकारला विचारण्यात येत आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात मिम्सही व्हायरल होत आहेत. त्यातच, कोल्हापूर जिल्हा भाजपाच्या महिला अध्यक्षांनीही हाच प्रश्न उपस्थित केला आहे.  

राज्यात एसटी महामंडळातील गाड्यांना आंतरजिल्हा प्रवासासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे या प्रवासासाठी कुठलल्याही पासची किंवा परवानगीची गरज असणार नाही. मात्र, सोशल डिस्टन्स व लॉकडाऊन नियमांचे पालन बंधनकारक आहे. प्रवाशी वाहतूक एकदम पूर्ववत होणार नसली तरी प्रवाशांचा प्रतिसाद विचारात घेवून बसगाड्यांचे शेड्यूल ठरविण्यात येणार आहे. प्रवाशी मर्यादा निश्चित करण्यात आल्याने तुर्तास निम्म्या प्रवाशांवरच ही वाहतूक होत असल्याचे दिसून येते. त्यानुसार, एका बसमध्ये जास्तीत जास्त 22 प्रवाशांनाच परवानगी देण्यात आली आहे. यावरुन, भाजपाच्या कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी अजब सरकरचा गजब निर्णय म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. 

 

जिल्हा परिषद सदस्या आणि भाजपा महिला अध्यक्षा असलेल्या महाडिक यांनी खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी परवानगीची आवश्यकता असल्याने सरकारला प्रश्न विचारला आहे. ''21 अनोळखी लोकं एका सार्वजनिक वाहनातून जाऊ शकतात, मात्र एकाच परिवारातील व्यक्ती वैयक्तिक चारचाकी अथवा दुचाकी वापरून परवानगी शिवाय कुठेही जाऊ शकत नाहीत'', असे म्हणत महाडिक यांनी सरकारवर टीका केलीय.
 
दरम्यान, आजपासून फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करणे आदी नियमांच्या अधिन राहून प्रवाशांना एसटी बसमधून प्रवास सुरू झाला आहे. 
बसमधून प्रवास करण्यासाठी कोविड-१९ च्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येणार असून, प्रवास करणाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. ई-पासची मात्र कोणतीही गरज नसल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: '21 strangers can go in Bus without permission, then why not 4 strangers in private vechile? ', shaumika mahadik ask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.