मुंबई : राज्यात गुरुवारी २१ हजार २७३ रुग्ण आणि ४२५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५६ लाख ७२ हजार १८० असून मृतांचा आकडा ९२ हजार २२५ इतका झाला आहे. सध्या राज्यात ३ लाख १ हजार ४१ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात दिवसभरात ३४ हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ५२ लाख ७६ हजार २०३ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.०३ टक्के असून मृत्यूदर १.६३ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ४० लाख ८६ हजार ११० प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण १६.६४ टक्के आहे. राज्यात २२ लाख १८ हजार २७८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर १९ हजार ९९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ४२५ मृत्यूंपैकी २७६ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १५८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या ४२५ मृत्यूंमध्ये मुंबई ३६, ठाणे ४, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा ६, कल्याण डोंबिवली मनपा ८, उल्हासनगर मनपा २, रायगड १६, पनवेल मनपा २, नाशिक २८, नाशिक मनपा ९, अहमदनगर ३५, अहमदनगर मनपा ६, जळगाव ४, नंदुरबार १, पुणे ३०, पुणे मनपा ९, पिंपरी चिंचवड मनपा ४, सोलापूर १८, सोलापूर मनपा १, सातारा २४, कोल्हापूर २९, कोल्हापूर मनपा ८, सांगली १४, सांगली मिरज कुपवाड मनपा ४, सिंधुदुर्ग ९, रत्नागिरी १६, परभणी ३, लातूर १, लातूर मनपा २, उस्मानाबाद ८, बीड १७, नांदेड ३, अकोला २, अमरावती ७, यवतमाळ १०, बुलडाणा १, वाशिम ३, नागपूर ४, नागपूर मनपा ४, वर्धा १४, भंडारा २, चंद्रपूर ८, गडचिरोली १२ इ. रुग्णांचा समावेश आहे.
राज्य
आजचा मृत्यूदर १.६३
आजचे मृत्यू ४२५
आजचे रुग्ण २१,२७३
सक्रिय रुग्ण ३,०१,०४१
मुंबई
आजचा मृत्यूदर २.८
आजचे मृत्यू ३६
आजचे रुग्ण १२५८
सक्रिय रुग्ण २८६८३