ट्रान्स हार्बरवर २१0 फेऱ्यांची वाढ
By admin | Published: October 26, 2016 04:55 AM2016-10-26T04:55:01+5:302016-10-26T04:55:01+5:30
नवी मुंबईत दिवसेंदिवस मोठ्या संख्येने उभी राहणारी संकुले आणि कार्यालये यामुळे येथील लोकसंख्येत वाढ होत असून, ठाणे ते पनवेल, वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावरील
मुंबई : नवी मुंबईत दिवसेंदिवस मोठ्या संख्येने उभी राहणारी संकुले आणि कार्यालये यामुळे येथील लोकसंख्येत वाढ होत असून, ठाणे ते पनवेल, वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकललाही गर्दी होताना दिसते. त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेकडून फेऱ्या वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. गेल्या १० वर्षांत तब्बल २१0 फेऱ्यांची भर पडल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
ठाणे ते पनवेल, वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. मात्र दोनच मार्ग उपलब्ध असल्याने फेऱ्या वाढवताना रेल्वे प्रशासनाच्या चांगलेच नाकीनऊ येतात. मध्य रेल्वेने टप्प्याटप्प्याने प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्यांमध्ये भर घातली आहे. २00६-0७ मध्ये साधारण तीन ते चार लोकलच्या २२ फेऱ्या चालविण्यात येत होत्या. २00८-0९ मध्ये त्यात १0४ फेऱ्यांची भर पडली.
त्यानंतर दर दोन वर्षांनी लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आले. २0१५-१६ मध्ये दहा ते बारा लोकलच्या २३२ फेऱ्या होतात. वाढीव फेऱ्या देऊन गर्दीतून प्रवाशांची सुटका करण्याचा प्रयत्न रेल्वेचा असल्याचे सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये असलेली एसी लोकल ही ट्रान्स हार्बर मार्गावरच चालविण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे. यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे.
यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांना विचारले असता, नवी मुंबईकडे असलेला जनतेचा ओढा
पाहता लोकल फेऱ्यांत वाढ केली आणि त्याचे नियोजनही
केल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)