आगामी २० वर्षांत देशाला हवीत २१०० नवी विमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:44 AM2017-08-02T02:44:37+5:302017-08-02T02:44:37+5:30

आगामी २० वर्षांत जगाला ४१ हजार नव्या विमानांची गरज भासणार असून, त्यापैकी तब्बल ५.१ टक्के म्हणजेच २१०० नव्या विमानांची देशाला गरज लागेल

2100 new planes for the country should be selected in the next 20 years | आगामी २० वर्षांत देशाला हवीत २१०० नवी विमाने

आगामी २० वर्षांत देशाला हवीत २१०० नवी विमाने

Next

मुंबई : आगामी २० वर्षांत जगाला ४१ हजार नव्या विमानांची गरज भासणार असून, त्यापैकी तब्बल ५.१ टक्के म्हणजेच २१०० नव्या विमानांची देशाला गरज लागेल, असे प्रतिपादन एशिया पॅसिफिक इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिनेश केसकर यांनी केले. मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशाला गरज असलेल्या २१०० विमानांची किंमत २९० बिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे १८ हजार ५७९ अब्ज) एवढी आहे.
बोइंग या विमान कंपनीने घेतलेल्या ‘करंट मार्केट आउटलूक २०१७’ या कार्यक्रमात, कंपनीच्या पुढील २० वर्षांची दिशा मांडली. त्यात कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवालही सादर करण्यात आला.
केसकर पुढे म्हणाले, ‘भारताचे दरडोई उत्पन्न वाढत आहे, इंधनाचे दर कमी होत आहे. भारतात विमान प्रवास करणाºयांची संख्यासुद्धा वाढत असल्यामुळे, येत्या काळात भारतात सर्वांत जास्त विमानांची गरज भासणार आहे.
त्यामुळे भारतातून मोठ्या प्रमाणात नव्या विमानांची मागणी होणार आहे. अशा मागण्या पूर्ण करण्याचे आव्हान या क्षेत्रासमोर असणार आहे. अधिकाधिक सुखसोई असलेली काही विमाने, येत्या काळात भारतीय मार्केटमध्ये अवतरल्याचे दिसून येणार आहे.’

Web Title: 2100 new planes for the country should be selected in the next 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.