Join us

215 नवीन बसेसचा प्रस्ताव रखडला

By admin | Published: November 25, 2014 11:12 PM

परिवहन सेवेत नव्याने दाखल होणा:या 23क् बससाठी कंत्रटी स्वरुपात वाहक घेण्याचा निर्णय ठाणो परिवहन सेवेने घेतला आहे.

मिरज : मिरजेत नऊशे गॅस्ट्रोबाधित रूग्ण सापडतात, ही परिस्थिती भयावह आहे. महापालिका बरखास्त करण्याची वेळ आली आहे, असे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी उद्वेगाने सांगितले. मिरजेत गॅस्ट्रोबाधित रूग्णांची पाहणी केल्यानंतर कदम यांनी, सर्व विकास कामे थांबवून महापालिकेचे सर्व बजेट गॅस्ट्रो साथीच्या प्रतिबंधासाठी व शुध्द पाणीपुरवठ्यासाठीखर्च करा, असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले. मिरजेतील गॅस्ट्रो साथीच्या पार्श्वभूमीवर पतंगराव कदम यांनी मिरज सिव्हिलमध्ये जाऊन रूग्णांची पाहणी केली. महापालिकेचे आयुक्त अजिज कारचे, गटनेते किशोर जामदार, इद्रिस नायकवडी, सिध्दार्थ जाधव, सभापती दिलीप बुरसे, अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर त्यांच्यासोबत होत्या. सिव्हिलमध्ये ३०९ गॅस्ट्रो रूग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मिरजेसह म्हैसाळ, बेडग परिसरातील १५ रूग्ण असल्याचे सांगण्यात आले. यावर पतंगराव कदम यांनी, एवढ्या मोठ्या संख्येने गॅस्ट्रो रूग्ण असतील, तर मिरजेची परिस्थिती भयावाह आहे, महापालिका बरखास्त करा, असे आयुक्तांना सुनावले. सर्व विकास कामे थांबवून महापालिकेचे संपूर्ण बजेट गॅस्ट्रोचा प्रतिबंध व शुध्द पाणी पुरवठ्यासाठी खर्च करा. अन्यथा नागरिक तुमच्यावर गुन्हे दाखल करतील, असेही त्यांनी सांगितले. मिरजेबाहेरील बेडग, म्हैसाळ परिसरातही गॅस्ट्रोचे रूग्ण असल्याबद्दल कदम यांनी आश्चर्य व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे सीओ काय करत आहेत? अशी विचारणा करीत, जिल्हा परिषदही बरखास्त करावी लागेल असे त्यांनी सांगितले. गॅस्ट्रोबाबत उपाययोजना करून आपली बाजू स्पष्ट करा, असे त्यांनी किशोर जामदार यांना सांगितले. सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याने गॅस्ट्रोची साथ सुरू आहे. याबाबत महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)महापालिका काय करीत आहे? अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांनी, सिव्हिलच्या आवारात पाण्याची डबकी आहेत, अस्वच्छतेमुळे आमच्या दोन डॉक्टरना डेंग्यू झाल्याची तक्रार केली. त्यावर, अधिष्ठाताही अस्वच्छतेबद्दल तक्रार करीत आहेत, महापालिका काय करीत आहे, अशी विचारणा कदम यांनी केली. यावर किशोर जामदार यांनी, दोन दूषित जलवाहिन्या स्वच्छ करण्यात आल्या आहेत. अधिष्ठातांची तक्रार आजच आम्हाला कळाल्याचे उत्तर दिले. महापालिकेच्या नेत्यांना आता याबाबत तंबी दिल्याचे अधिष्ठाता डॉ. डोणगावकर यांना कदम यांनी सांगितले.